शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले

By विशाल सोनटक्के | Updated: July 1, 2024 12:52 IST

२९ मंडळांमध्ये अतिवृष्टी : जिल्ह्यात सरासरी ३७ मिमी पाऊस

यवतमाळ : रविवारी रात्री यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस बरसला. दिग्रसमध्ये सर्वाधिक ७८.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर यवतमाळ तालुक्यातही सरासरी ७०.८ मिमी पाऊस कोसळला. जिल्ह्यातील २९ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस होता. 

रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळत होता. रात्री ७.३० नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू होता. जोरदार पावसामुळे जिल्ह्याच्या विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. सर्वाधिक पावसाची नोंद दिग्रस तालुक्यात झाली असून येथे ७८.२ मिमी पाऊस झाला आहे. यवतमाळ तालुका ७०.८, बाभूळगाव ५१.२, कळंब ६३.४, दारव्हा ६९, आर्णी ६५.८, नेर ४२.६, पुसद ४९.८, उमरखेड ३०.१, महागाव ३०.९, वणी १.६, मारेगाव ०.७, झरी जामणी १.९, केळापूर २, घाटंजी १०.५ तर राळेगाव तालुक्यात २२.३ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. 

या मंडळामध्ये झाली अतिवृष्टीजिल्ह्यातील ३६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये यवतमाळ तालुक्यातील यवतमाळ ७८.२५, हिवरी ८४, अर्जुना ८४, सावरगड ७८.२५, मोहा ८६.२५ आणि लोहारा मंडळात ८३.५० मिमी पाऊस झाला आहे. बाभूळगाव तालुक्यातील पहूर मंडळात ७१.५० मिमी पाऊस झाला. कळंब तालुक्यातील चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात कळंब मंडळ ६५, पिंपळगाव ९३.५०, सावरगाव ८७.७५, जोडमोहा ६९, दारव्हा तालुक्यातील दारव्हा मंडळात ६५, मांगकिन्ही ६६.५०, बोरी ८३, लाडखेड ९२.५० आणि महागाव मंडळात ९२.५० मिमी पाऊस झाला आहे. दिग्रस तालुक्यातील कलगाव मंडळात ११६.२५, तुपटाकळी ११६.२५ आणि सिंगद मंडळात ७२.७५, आर्णी तालुक्यातील आर्णी मंडळात ९८.२५, जवळा १२८.५०, बोरगाव ९८.२५, नेर तालुक्यातील मालखेड मंडळात १११.२५, पुसद तालुक्यातील  खंडाळा मंडळात ८५.५०, बेलोरा ७४, ब्राम्हणगाव ७८, जांबबाजार ७८, महागाव तालुक्यातील काळीदौलत मंडळात ६८.७५ तर राळेगाव तालुक्यातील राळेगाव मंडळात ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसYavatmalयवतमाळfarmingशेती