शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पग्रस्तांना गावातच मोबदला

By admin | Updated: April 22, 2017 01:46 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया रेकॉर्डब्रेक पद्धतीने सुरू आहे.

 वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग : पालकमंत्री, खासदारांच्या उपस्थितीत पाच कोटींचे वितरण यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया रेकॉर्डब्रेक पद्धतीने सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांना थेट त्यांच्या गावात जाऊन मोबदला दिला जात आहे. कळंबनंतर यवतमाळ तालुक्यातील ३० शेतकऱ्यांना तळेगाव येथे चार कोटी ७० लाखांचे वाटप करण्यात आले. यामुळे तीन किलोमीटर रेल्वे रुळासाठी जमीन उपलब्ध झाली आहे. पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, रेल्वेचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा अवधी देण्यात आला. प्रत्यक्षात अकरा महिन्यातच अवॉर्ड घोषित करून खरीप हंगामापूर्वी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसोबतच शासनाचाही फायदा झाला आहे. दोन वर्षात व्याजापोटी ७३ लाख ६७ हजार अतिरिक्त द्यावे लागले असते. शिवाय प्रकल्पग्रस्तांनाही ताटकळत रहावे लागले असते. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे भू-संपादन अधिकारी विजय भाकरे यांनी शिघ्रसिद्ध गणकानुसार शेतीचा मोबदला निश्चित करून त्याचा लाभ दिला. याच पद्धतीने रेल्वे मार्गासाठी कळंब आणि आता यवतमाळ तालुक्यात जमीन संपादन झाली आहे. जूनअखेर इतर तालुक्यातीलही भू संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस रेल्वे भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांनी व्यक्त केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी) प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या दारी भूसंपादन प्रक्रियेतील मोबदला मिळविण्यासाठी विविध दस्तऐवज लागतात. या कारणाने प्रकल्पग्रस्तांना जिल्हाधिकारी कार्यालयात येरझारा घालाव्या लागतात. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी थेट प्रशासनच प्रकल्पग्रस्तांच्या दारी पोहोचले. तिथेच कागदपत्रांची पूर्तता केली तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जागेवर देण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना खूष झाले.