शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रेल्वे भूसंपादन मोबदला वितरण

By admin | Updated: May 7, 2017 00:57 IST

वर्धा-यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जात असून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

धडक अभियान : शासन आपल्या दारी, २७ कोटी शेतकऱ्यांच्या हाती धनादेश लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : वर्धा-यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जात असून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवून थेट शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जावून मोबदला दिला जात आहे. याच उपक्रमांतर्गत शनिवारी बाभूळगाव पंचायत समितीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारी येथील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदल्याचे धनादेश देण्यात आले. रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शासन आपल्या दारी उपक्रम राबवित ३ वर्षांतील प्रकरणांचा ११ महिन्यात निपटारा केला. यातून ३ कोटी रुपयांची बचत झाली. याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांची प्रशंसाही केली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी थेट गावात जाऊन लाभार्थ्यांना मोबदला देत असल्याचे सांगितले. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार अशोक उईके उपस्थित होते. शुक्रवारी बोरजई येथे जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते २६ कोटी ७४ लाखांचे वाटप करण्यात आले. यातून तब्बल ११८ हेक्टर ४८ आर. जमीन संपादित केली. यामुळे १८ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी जमीन उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांच्या पुढाकारात ही प्रक्रिया राबविली जात आहे. कळंब आणि यवतमाळ तालुक्यातील शेत जमीन संपादनाची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. एकूण ५८ किलोमीटरचा मार्ग येथून जाणार आहे. त्यापैकी २९ किलोमीटर रेल्वे मार्गासाठी जमिनीचे संपादन करून मोबदला वाटप झाले. आता उर्वरित आट प्रकरणांमध्ये १०० कोटींचा मोबदला वितरित केला जाणार आहे. हे उद्दिष्ट एक महिन्यात पूर्ण करण्याचा विडा भूसंपादन विभागाने उचलला आहे. एकरकमी मिळालेली रक्कम शेतकऱ्यांसाठी लाभाची ठरत आहे. त्यांना यातून इतरत्र मालमत्ता खरेदी करता येणार आहे. शिवाय चार पट मोबदला मिळत असल्याने न्यायालयीन प्रक्रियेवर होणाऱ्या खर्चातूनही त्यांची सुटका झाली.