शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या वीज कर्मचाऱ्यांना रायगडाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:49 IST

३ जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. त्यात रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. रायगडाचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विदर्भातील वीज कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक बोलाविली गेली.

ठळक मुद्दे३५८ जण तातडीने रवाना निसर्ग चक्रीवादळानंतर युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्ग चक्रीवादळाच्या धुमाकुळाने निसर्गसंपन्न रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधांची दाणादाण उडाली. पंधरवाडा लोटूनही महावितरणचे उद्ध्वस्त झालेले जाळे दुरुस्त होऊ शकलेले नाही. अखेर रायगडाचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विदर्भातील वीज कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक बोलाविली गेली.रायगडाची हाक येताच तब्बल ३५८ वीज कर्मचारी, अधिकारी प्रतिनियुक्तीवर गेले. स्वजिल्ह्यात पावसाळी वातावरणामुळे दुरुस्तीची कामे प्रलंबित असताना आणि राज्यात कोरोनाचे भीतीदायक वातावरण असतानाही हे कर्मचारी मंगळवारीच रवाना झाले.३ जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. त्यात रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. विशेषत: वीज महावितरणची संपूर्ण यंत्रणा जमीनदोस्त झाली. त्यामुळे १५ दिवसांपासून तेथील वीज पुरवठा ठप्प आहे. पिण्याचे पाणी व इतर समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणची नेटवर्कची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यासाठी महावितरण संचालकांनी (संचालन) महाराष्ट्रातून अतिरिक्त कर्मचारी तातडीने रायगडात प्रतिनियुक्तीवर पाचारण केले. विशेष म्हणजे सोमवारी हे आदेश धडकताच मंगळवारी सकाळीच ३५८ कर्मचारी रायगडकडे रवाना झाले. यात नाशिक व औरंगाबाद मंडळातील कर्मचाऱ्यांचाही नगण्य समावेश असला तरी तब्बल सव्वादोनशे कर्मचारी विदर्भातील आहेत.यात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा विभागातून सहायक अभियंत्यासह आठ कर्मचारी, पुसद विभागातून उपकार्यकारी अभियंत्यासह नऊ तर यवतमाळ विभागातून उपकार्यकारी अभियंत्यासह ११ जण रायगड जिल्ह्यात प्रतिनियुक्तीवर गेले आहे.

टॅग्स :electricityवीज