शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपताच रेतीघाट तस्करांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

रेती घाट लिलाव झाल्यावर या रेतीघाटावर लिलाव घेणाऱ्यांची करडी नजर असते. त्यामुळे रेतीची तस्करी करणे कठीण असते. रेती लिलाव होण्यापूर्वीच हे रेती तस्कर चोरट्या मार्गाने या रेतीचा साठा करत आहे. मागील आठवड्यात १५ दिवस पाऊस कोसळला नाही. त्यामुळे काही रेती घाटापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुरू होताच, अंधाराचा फायदा घेत रेती तस्करांनी रेतीचा साठा करणे सुरू केले आहे. परंतु आणखी अचानक तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने रेती तस्करीला ‘ब्रेक’ लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : यावर्षी धो-धो कोसळणारा पाऊस कमी होताच तालुक्यातील रेती घाटावरील रेतीची तस्करी करण्याचे नियोजन रेती तस्करांनी आखले आहे. दोन आठवडे पाऊस गायब होताच, रेती तस्करीला सुरुवात झाली असून महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या सुमारास या रेती तस्करांकडून रेतीचा वारेमाप उपसा केला जात आहे. तालुक्यात वर्धा नदीवरील कोसारा, दांडगाव गाडेगाव आदी  ठिकाणी रेती घाट आहे, तर निर्गुडा नदी आणि इतर मोठ्या नाल्यांवरसुद्धा रेतीचे मुबलक साठे आहेत. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाने या रेतीघाटाचे लिलाव करून हे रेती घाट तीन वर्षांच्या कालावधीनंतर खुले केले होते. यावर्षीसुद्धा तालुक्यातील सर्वच रेती घाट लिलाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेती घाट लिलाव झाल्यावर या रेतीघाटावर लिलाव घेणाऱ्यांची करडी नजर असते. त्यामुळे रेतीची तस्करी करणे कठीण असते. रेती लिलाव होण्यापूर्वीच हे रेती तस्कर चोरट्या मार्गाने या रेतीचा साठा करत आहे. मागील आठवड्यात १५ दिवस पाऊस कोसळला नाही. त्यामुळे काही रेती घाटापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सुरू होताच, अंधाराचा फायदा घेत रेती तस्करांनी रेतीचा साठा करणे सुरू केले आहे. परंतु आणखी अचानक तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने रेती तस्करीला ‘ब्रेक’ लागला आहे. रेतीला मिळणारे दर पाहता तस्कराची संख्या वाढली आहे. स्थानिक पुढारी राजकीय आश्रय मिळवत रेती तस्करीच्या व्यवसायात येत असल्याचे काही घटनांवरून उघड होत आहे. आगामी सणासुदीचे दिवस पाहता आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची व्यस्तता पाहता, या रेती चोरीला उधाण येण्याची शक्यता आहे. प्रशासकीय कर्मचारी  सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाणार असल्याने नेमका याचा फायदा उचलत मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

 शासनाने रेतीघाटांचा लिलाव करण्याची मागणी  - रेतीचा चढा दर आणि तस्करीतून होणारी कमाई पाहता, या व्यवसायात अनेकजण येत आहेत. जिल्हा प्रशासन या रेती घाटाचे लवकर लिलाव करत नसल्याने रेती तस्करीला चांगलाच वाव मिळत आहे. तालुका प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून जरी या रेती घाटाचे रक्षण केले तरी रेती चोरीच्या घटना घडणारच आहेत. त्यात राजकीय दबाव प्रशासनावर येत असतो. त्यामुळे रेती तस्करी रोखताना  तालुका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. त्याचा परिणाम रेती लिलावाच्या रकमेवर होतो. त्यापेक्षा जिल्हा प्रशासनाने या रेती घाटाचे लवकर लिलाव करावे, अशी मागणी रेती घाट खरेदीदारांकडून होत आहे.

 

टॅग्स :sandवाळू