शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

रबी ५० हजार हेक्टरने घटणार

By admin | Updated: October 30, 2014 22:57 IST

निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, वीज संकट आणि खरिपाने दिलेला दगा आदी कारणांनी जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र यंदा तब्बल ५० ते ६० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी

शेतकरी धास्तावले : थंडीचाही पत्ता नाही, वीज संकट कायम ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील बदल, वीज संकट आणि खरिपाने दिलेला दगा आदी कारणांनी जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र यंदा तब्बल ५० ते ६० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पुरेसे पाणी असले तरी कालवे नादुरुस्त असल्याने सिंचनातही अडसर येणार आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी रबी लागवड करताना हात आखडता घेण्याचा निर्णय घेतला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा यंदा शेतकऱ्यांना जबर तडाखा बसला. अपुऱ्या पावसाने खरीप हातचा गेला. सोयाबीनच्या ३० किलो बॅगला ८० किलोचा उतारा येत आहे. मजुरीही यातून निघत नाही. कापसाचीही अशीच अवस्था आहे. एकरी आठ ते दहा हजार रुपये खर्च करूनही निम्मे पैसे निघण्याची शक्यता नाही. दोनही नगदी पीक हातचे गेल्याने शेतकरी धास्तावला आहे. अशातच रबी हंगामाला प्रारंभ होत आहे. मात्र शेतकरी रबी हंगामाच्या मन:स्थितीत दिसत नाही. परिणामी जिल्ह्याच्या रबी हंगामाच्या क्षेत्रात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गहू, हरभरा यासह सूर्यफुल आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. कृषी विभागाने रबी हंगामाचे नियोजन केले असून यंदा एक लाख २६ हजार ८०४ हेक्टरवर रबीची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यात ८४ हजार ९९२ हेक्टर हरभरा आणि ३९ हजार २९२ हेक्टर गहू व इतर पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गतवर्षी जिल्ह्यात एक लाख ८० हजार ५७० हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र एक लाख ४० हजार ५६७ हेक्टर होते. तर गहू ३४ हजार ४९९ हेक्टरवर पेरण्यात आला होता. यंदा गतवर्षीच्या हरभरा क्षेत्रापेक्षाही कमी क्षेत्रावर गहू-हरभराची लागवड होणार असल्याचे कृषी विभागाच्या नियोजनावरून दिसत आहे. तब्बल ५३ हजार ७६६ हेक्टर गतवर्षी पेक्षा यंदा रबीचे कमी क्षेत्र राहणार आहे. रबीच्या क्षेत्रात घट येण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे वीज भारनियमन होय. पुरेसे पाणी असतानाही खरिपातच शेतकऱ्यांंना सिंचन करता आले नाही. दोन ते तीन तास वीज मिळत असल्याने ओलित करणे अशक्य होते. हीच स्थिती रबी हंगामातही राहण्याची शक्यता असून उभे पीक डोळ्याने वाळताना पाहण्यापेक्षा पेरणीच न केलेली बरी, असा अनेक शेतकऱ्यांचा सध्या तरी सूर दिसत आहे. गतवर्षी झालेल्या गारपिटीनेही शेतकरी यावर्षी पेरणीसाठी पुढे येताना दिसत नाही. ऐन हरभरा काढण्याच्यावेळी प्रचंड गारपीट झाली. गहू, हरभरा पीक उद्ध्वस्त झाले. यंदाही निसर्गाचा लहरीपणा दिसत आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली होती. या सर्व बाबींचा परिणाम रबी हंगामाच्या क्षेत्रावर होत आहे.