शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुसदमध्ये अकरा हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय १६५ हेक्टरवर रबी ज्वारी, ९५ हेक्टरवर चारा पीक, ४२२ हेक्टरमध्ये ऊस तर ३४५ हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देअद्याप साडेचार हजार हेक्टर बाकी : गहू आणि हरभरावर जोर

  लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत तब्बल ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी केली आहे. त्यात गहू आणि हरभरासह विविध पिकांचा समावेश आहे. यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय १६५ हेक्टरवर रबी ज्वारी, ९५ हेक्टरवर चारा पीक, ४२२ हेक्टरमध्ये ऊस तर ३४५ हेक्टरवर भाजीपाला पिकाची लागवड पूर्ण झाली आहे. अद्यापही चार ते चार हजार ५०० हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली नाही. कृषी विभागाने लवकरच ही पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला. यावर्षी हरभरा पेरणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याखालोखाल शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्या हरभरा खुडणीला आला आहे. काही ठिकाणी डवरणीसुद्धा सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रबीतील पिकांना दोन पाळ्यांमध्ये पाणी दिले आहे. काही परिसरात पेरणी झालेला गहू अंकुरत आहे. शेतकरी आता रबीतील पिकांच्या सिंचनाकडे लक्ष देत आहे. खरीप हंगामातील नुकसान या पिकांमधून भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी दिवसरात्र सिंचन केले जात आहे. मात्र रात्री सिंचन करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. अनेकांना सर्पदंशाच्या घटना घडल्या आहे.

विजेअभावी शेतकऱ्यांचे हाल रबी हंगामातील बहुतांश पेरणी पूर्णत्वास गेली आहे. आता पिकांचे सिंचन सुरू झाले. मात्र लोडशेडींग आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर समस्या उभी ठाकली आहे. ओलितासाठी दिवसभर सलग वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. विजेअभावी अनेक शेतकऱ्यांना रात्री सिंचन करावे लागते. मात्र रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे सलग वीज उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :agricultureशेती