शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सहा तास रांगेत, तरीही पैसा नाही

By admin | Updated: November 16, 2016 00:24 IST

पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आल्यानंतर पैसे काढण्यासाठी बँकांसह एटीएममध्ये प्रचंड रांगा लागल्या आहेत.

लिंक फेल : अनेक एटीएमसमोर पहाटेपासूनच ग्राहकांच्या रांगा यवतमाळ : पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आल्यानंतर पैसे काढण्यासाठी बँकांसह एटीएममध्ये प्रचंड रांगा लागल्या आहेत. अनेक एटीएममध्ये पैशाचा खडखडाट असला तरी नागरिक मात्र रांगेत कायम आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ग्राहक तब्बल सहा तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हातानेच परतले. यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. त्यातूनच पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्यापर्यंत नागरिकांचा संताप अनावर झाला. लिंक फेल झाल्याने बँकेचे कामकाजही काही तास प्रभावित झाले. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँका आणि ग्रामीण बँकांच्या २५७ शाखेतून दररोज कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत आहे. डिपॉझीट करण्यासोबत विड्रॉल करणे आणि नोटांचा बदल करणे यासाठी दिवसभर रांगा कायम असतात. गत पाच दिवसातील ही उलाढाल ४५० कोटींच्या घरात आहे.मंगळवारी जिल्ह्यातील एटीएमपुढे सर्वाधिक गर्दी होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएमवर सर्वाधिक गर्दी होती. सकाळी ११ वाजतापासून ही रांग होती. मात्र सहा तास प्रतीक्षा केल्यानंतरही नागरिकांना पैसे मिळाले नाही. दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हातानेच परत जावे लागले. अशीच स्थिती बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि आंध्रा बँक आणि इतर ठिकाणी दिसून येत होती. यामुळे ग्राहक संतप्त झाले होते. (शहर वार्ताहर) पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमवर तोडफोड झाल्यानंतर पोलीस संरक्षणाची मागणी झाली. प्रत्यक्षात घटनेपूर्वीच पोलीस संरक्षणाची मागणी बँक व्यवस्थापनाने करायची होती. जिल्ह्यात सुरक्षा मागणाऱ्या व्यवस्थापनाला पोलीस संरक्षण दिले जाणार आहे.- प्रशांत देशपांडे, अग्रणी बँक व्यवस्थापक, यवतमाळ