शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पूर संरक्षक भिंतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: September 1, 2014 00:16 IST

गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत आर्णी मार्गावरील हिवरी गावाला पुराचा तडाखा बसत आहे. नाल्यावरील पूरसंरक्षक भिंतीअभावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी नाल्याला पूर येवून

हिवरी : गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत आर्णी मार्गावरील हिवरी गावाला पुराचा तडाखा बसत आहे. नाल्यावरील पूरसंरक्षक भिंतीअभावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी नाल्याला पूर येवून गावातील अडीचशे घरात पाणी घुसले होते. त्यामध्ये गावकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. याहीवर्षी प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणाने तीच परिस्थिती आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसा झालेल्या पावसाची गावकऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून आले.आर्णी मार्गावर हिवरी हे गाव आहे. गावाला लागूनच मोठा नाला असून त्याचे पाणी गावात शिरू नये म्हणून आजवर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. गतवर्षी या नाल्याचे पाणी गावात शिरून अन्नधान्य आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. त्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले. शाळेत आणि ग्रामपंचायत कार्यालयात पूर पीडितांची व्यवस्था करण्यात आली. या परिस्थितीवर काही दिवस उलटल्यानंतर मात्र पुराने बाधित झालेल्या कुटुंबांनाच आपले संसार उभे करावे लागले. शासनाकडून प्रभावी मदत मिळाली नाही. दरम्यान, त्यावेळी लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने पूर संरक्षक भिंत बांधण्याची कबुली दिली होती. ती आजवर पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हिवरी गावात पूर शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच खासदार फंडातून बांधलेल्या समाज भवनामुळे पाण्याचे लोट गावात शिरत आहे. त्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)