शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अजगरने वाघिणीच्या डोक्यात घातल्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:12 IST

राळेगाव परिसरातील बोराटीच्या जंगलातील कुबट अंधाराला भेदत वनविभागाचे पथक शार्पशुटरसह नरभक्षी वाघिणीचा ‘गेम’ करण्यासाठी पुढे सरसावताच, काही कळण्याच्या आत झुडूपात लपून बसलेल्या वाघिणीने पथकाच्या जिप्सीवर थेट हल्ला चढविला.

ठळक मुद्देमोहिमेवर पडदा : हजारो गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

योगेश पडोळे / शेषराव राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा / मोहदा : राळेगाव परिसरातील बोराटीच्या जंगलातील कुबट अंधाराला भेदत वनविभागाचे पथक शार्पशुटरसह नरभक्षी वाघिणीचा ‘गेम’ करण्यासाठी पुढे सरसावताच, काही कळण्याच्या आत झुडूपात लपून बसलेल्या वाघिणीने पथकाच्या जिप्सीवर थेट हल्ला चढविला. चवताळलेली वाघिण पथकातील कर्मचाऱ्यांच्या नरडीचा घोट घेण्याच्या तयारीत असतानाच शार्पशुटर नवाब शहाफतअली खान याचा मुलगा अजगर अलीखान याने वाघिणीच्या डोक्यात गोळ्या घालून तिला ठार मारले अन् दिड महिन्यापासून सुरू असलेल्या टी-१ मोहिमेवर पडदा पडला.शुक्रवारी राळेगावचा आठवडी बाजार असल्याने बोराटी येथील शेतकरी-शेतमजूर बाजारासाठी राळेगावकडे जात असताना अनेकांना या नरभक्षी वाघिणीने तिला या रस्त्यावर दर्शन दिले. त्यानंतर नागरिकांनी यासंदर्भात वन विभागाला याबाबतची माहिती दिली. त्यामुळे वन विभागाने तातडीने या भागात गस्त वाढविली. कॅमेरे लावण्यात आले. तिला ट्रॅन्क्युलाईझ करण्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्या आणि अखेर रात्री अकरा वाजताच्या सुमारास वन विभागाच्या पथकाच्या टप्प्यात ही वाघिण आली. काही कळायच्या आत झुडपातून तिने थेट जिप्सीवर अचानक धावा केला. यावेळी पथकातील शेख मुकबीर शेख या शूटरने तिच्यावर ट्रॅन्क्युलाईझ डॉट  मारला. त्यामुळे वाघिण पुन्हा बिथरली. थेट सात-आठ मीटर समोर येऊन जीपवर उडी मारणार तोच अजगर अली याने तिच्या डोक्यात गोळ्या घालून तिला ठार मारले. त्यामुळे तीन तालुक्यातील भीतीचे वातावरण संपले.बोराटीची सोनाबाई ठरली पहिली बळीजून २०१६ मध्ये बोराटे या गावातील सोनाबाई भोसले या महिलेचा या वाघिणीने पहिला बळी घेतला होता. तेव्हापासून या वाघिणीचा धुमाकूळ सुरूच होता. दोन वर्षात या वाघिणीने १३ जणांचे बळी घेतले. या वाघिणीने पहिला बळी ज्या गावात घेतला, त्याच गावात तिचा बळी जाणार हे तिला ठाऊकही नव्हते. मात्र ज्या ठिकाणी तिने सोनाबाईचा जीव घेतला होता त्याच ठिकाणी तिलाही शिकार बनावे लागले.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणTigerवाघ