शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘जय शिवराय’च्या गजराने पुष्पावंतीनगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:22 IST

येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मात्र सायकल रॅली व शोभायात्रा रद्द करून पुलवामा हल्ल्यातील शहीदवीरांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देशहिदांना सामूहिक श्रद्धांजली : शिवप्रेमींची लक्षणीय उपस्थिती, हल्ल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मात्र सायकल रॅली व शोभायात्रा रद्द करून पुलवामा हल्ल्यातील शहीदवीरांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार मनोहरराव नाईक, नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी जय जिजाऊ-जय शिवरायांच्या घोषणा दिल्या. या घोषणांनी पुष्पावंतीनगरी दुमदुमून गेली. छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीतर्फे पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम झाला. शिवपूजन सोहळ्याला आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, अ‍ॅड. आशिष देशमुख, वसंतराव पाटील, डॉ. अकील मेमन, डॉ. मो. नदीम, महेश खडसे, दीपक आसेगावकर, दिगांबर जगताप आदी उपस्थित होते.जन्मोत्सव समितीने शिवजयंतीनिमित्त शहरातील प्रमुख मार्गाने सायकल रॅली व सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाल्याने हे कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्याऐवजी शहिदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी श्रीकांत सरनाईक, अ‍ॅड. उमेश चिद्दरवार, वर्षा पाटील, शुभांगी पानपट्टे, रुपाली पवार, डॉ. जय भोपी, निशांत बयास, राजू दुधे, अ‍ॅड. महेश निर्मळ, अ‍ॅड. उमाकांत पापीनवार यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, पुसद चेंबर आॅफ कॉमर्स, पुसद अर्बन बँक व विविध संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाManoharrao Naikमनोहरराव नाईक