शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

उन्हाच्या चटक्यांनी पुसदकर हैराण

By admin | Updated: May 8, 2017 00:22 IST

अंग भाजून काढणारे उन्ह, लाहीलाही करायला लावणारा असह्य उकाडा, रस्त्याने चालताना सुटणाऱ्या घामाच्या धारा

वैशाख वणवा : माणसांसोबत जनावरेही शोधत आहेत सावलीचा आधार लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : अंग भाजून काढणारे उन्ह, लाहीलाही करायला लावणारा असह्य उकाडा, रस्त्याने चालताना सुटणाऱ्या घामाच्या धारा अशी काहीशी अवस्था पुसदकरांची झाली आहे. विदर्भातील हॉट सिटी असलेल्या पुसदमध्ये सध्या पारा ४४ अंशाच्यावर आहे. पुसदच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढउतार जाणवत आहे. तरीही वातावरणात बाष्प नसल्याने उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, ४४ अंशापेक्षा अधिक तापमान गेल्याने पुसदकरांचा जीव कासावीस झाला आहे. वैशाख वणवा अनुभवत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, उन्हाचा तडाखा असे संमिश्र वातावरण अनुभवयाला मिळत असल्याने जनता त्रस्त झाली आहे. घरात बसूनही घामाच्या धारा लागत असून, पंख्यातून येणारी हवाही गरी भासत असल्याने पुसदकरांना उकाडा असह्य झाला आहे. बाष्पयुक्त वाऱ्यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. तसेच दिवसा उकाडा सहन करावा लागत असताना रात्रीचेही तापमान चढेच राहत असल्याने पुसदकरांच्या त्रासात भर पडली येते. सकाळी ८ वाजेपासून उन जाणवायला लागते. दिवसभर त्याची तीव्रता कायम राहते. सायंकाळी साडे सहापर्यंत ही धग राहते. रखरखत्या उन्हात घराबाहेर जाणे कठीण होते. लग्नसराईचा दिवस असल्याने खरेदीसाठी ग्रामीण जनता पुसदला उन्हाची तमा न बाळगता येतात. मे महिन्यात लग्नसराई अधिक असल्याने लग्न समारंभात उपस्थित राहणाऱ्या नातेवाईकांचे उन्हामुळे हाल होत आहे. यावर्षी मार्च महिन्यांपासूनच उन्हाची तीव्रता अधिक होती. उन्हाच्या काहिलीने नागरिक घामाघूम होत असून, घराबाहेर पडतात त्याना विचार करावा लागत आहेत. रुग्ण संख्येत वाढ उन्हाची तीव्रता वाढल्याने उलट्या, मळमळ, ताप, डोकेदुखी, अंगदुखी असे आजार वाढले आहेत. त्यामुळे शासकीय व खासगी दवाखान्यात रूग्णांची संख्येत वाढ झाली आहे. भारनियमनाची भर तापमान ४४ अंशापर्यंत पोहचला असतानाच त्यात भर म्हणून विजेचा लपंडाव व भारनियमनही सुरू आहे. पुसद शहरात केव्हाही वीज येते अन जातेही त्यामुळे विद्युत उपकरणे बंद पडत आहे. नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडत आहे. विशेष म्हणजे भारनियमनाच्या वेळाही घोषित झालेल्या नाहीत, हे विशेष.