शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादी काडतूस प्रकरणात पुसदच्या पिता-पुत्राला अटक

By admin | Updated: February 6, 2016 02:33 IST

हैदराबाद येथून काडतूस घेऊन येणाऱ्या तिघांचा आश्रयदाता असलेल्या पुसदच्या पिता-पुत्राला दराटी पोलिसांनी नांदेड येथून अटक केली.

दराटी पोलिसांची नांदेडमध्ये कारवाई : चार दिवसांची पोलीस कोठडीउमरखेड : हैदराबाद येथून काडतूस घेऊन येणाऱ्या तिघांचा आश्रयदाता असलेल्या पुसदच्या पिता-पुत्राला दराटी पोलिसांनी नांदेड येथून अटक केली. यातील पित्याला पुसद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर मुलगा चार दिवस दराटी पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे. इम्तीयाज खान सरदार खान आणि त्याचा पिता सरदार खान अशी या आरोपींची नावे आहे. ते पुसदमधील रहिवासी आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री दराटी पोलिसांनी गस्ती दरम्यान हैदराबाद येथील तीन युवकांना अटक केली होती. त्यांच्याजवळून बंदुकीचे ६० काडतूस जप्त करण्यात आले होते. त्यांनी हा दारूगोळा आपण पुसद येथील इम्तीयाज खान सरदार खान याच्यासाठी नेत असल्याची कबुली दिली होती. त्यावरून इम्तीयाजच्या घराची झडती घेतली असता काडतूस, पासपोर्ट फोटो, बनावट राशन कार्ड आढळून आले होते. तेव्हापासून पोलीस इम्तीयाज व त्याचा पिता सरदार खान या दोघांच्या शोधात होते. गेल्या ४० दिवसांपासून ते पोलिसांना हुलकावण्या देत होते. त्यांनी वारंवार मोबाईलचे सीमकार्ड बदलून तसेच मुंबई, औरंगाबाद व अन्य शहरात फिरुन पोलिसांचा ससेमिरा चुकविला. दरम्यान हे दोघेही नांदेडच्या श्रीनाथ नगरात भाड्याने घर घेऊन राहत असल्याची टीप दराटीचे ठाणेदार सागर इंगोले यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता सापळा रचून दोघांनाही अटक केली. इम्तीयाजचा पिता सरदार खान याला खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यात तो तीन वर्ष नागपूर मध्यवर्ती कारागृहात राहिला. दरम्यान त्याला संचित रजा मंजूर झाली होती. मात्र त्यानंतर तो कारागृहात परतलाच नाही. त्यामुळे पोलीस त्याच्या शोधात होते. त्याच्याविरुद्ध पुसद पोलीस ठाण्यात भादंवि २२४ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. अखेर सरदार खानला पुसद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तर इम्तीयाजला उमरखेडच्या न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. इम्तीयाजच्या अटकेने हैदराबादवरून आलेले काडतूस नेमके कुण्यासाठी, यापूर्वी कितीवेळा दारूगोळ्याची खेप आली, बंदुका आणल्या का, हा दारूगोळा नेमका कुठे वापरला जात होता, येथून तो कुठे पुढे पास केला जात होता, अशा अनेक प्रश्नांची उकल करणे पोलिसांना सोईचे होणार आहे. (शहर प्रतिनिधी)