शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहर गेले खड्ड्यात, सर्वत्र घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आणि सत्ता असलेल्या पुसद नगरपरिषद क्षेत्रातील शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ‘स्वच्छ व सुंदर शहर’ हा नारा केवळ कागदावरच राहिला आहे. पुसद शहरातील रस्ते खड्ड्यात गेले, असा संतप्त सूर जनतेतून ऐकायला मिळतो आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष : सत्ताधाऱ्यांचे यंत्रणेवर नियंत्रणच नाही, जनता वैतागली, आरोग्य धोक्यात

पुसद : राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आणि सत्ता असलेल्या पुसद नगरपरिषद क्षेत्रातील शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ‘स्वच्छ व सुंदर शहर’ हा नारा केवळ कागदावरच राहिला आहे. पुसद शहरातील रस्ते खड्ड्यात गेले, असा संतप्त सूर जनतेतून ऐकायला मिळतो आहे. शहराच्या मुख्य मार्गावरच ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कचºयाचे हे ढीग पाहता नगरपरिषद कचरा व्यवस्थापनावर लाखो रुपयांचा खर्च नेमका कुठे करते, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतो. नगरपरिषदेमध्ये अधिकारी-कर्मचारीच मुजोर झाले आहे. त्यांच्यावर ‘मार्जीन’च्या राजकारणामुळे पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण उरलेले नाही. याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रस्त्याच्या मधोमध लावलेली झाडेही वाळली आहे. शहरात अनेक ठिकाणी गटार साचले असून त्याच्या दुर्गंधीने सामान्य जनता वैतागली आहे. स्तंभ, पुतळा परिसरांनाही विद्रूप स्वरूप आले आहे. रस्ते उखडले, नाल्या तुंबल्या, दुकानगाळे तुटले, ठिकठिकाणी अतिक्रमण अशी अवस्था आहे.‘स्वच्छ व सुंदर’ शहर झाले इतिहासजमातीन आमदार असूनही शहराची उपेक्षा कायमचपुसद शहराला काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तीन पक्षांचे आमदार आहेत. त्यांच्यामुळे पुसदच्या राजकीय वैभवात भर पडली असली तरी जनतेला दिलासा देणारे कोणतेही वैभव त्यांना अद्याप तरी पुसदसाठी खेचून आणता आलेले नाही. शहराची अवस्था पाहता या आमदारांचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे व त्यांना सामान्य जनतेच्या समस्यांशी काहीएक सोयरसूतक नसल्याचेच स्पष्ट होते. त्यांनी या अवस्थेचा आढावा घेतल्याचे ऐकिवात नाही.