शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग रद्द झाल्याने गुंतवणूकदारांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:56 IST

राजेश निस्ताने । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : धारणी-करंजी हा ३१४ किलोमीटरचा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग नीती आयोगाने रद्द केल्याने ...

ठळक मुद्देधारणी-करंजी : शासनाला चौपट दरात जमिनी विकण्याचा मनसुबा उधळला

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धारणी-करंजी हा ३१४ किलोमीटरचा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग नीती आयोगाने रद्द केल्याने या मार्गावरील तमाम गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. महामार्गाच्या भूसंपादनात जमिनी जातील आणि शासनाकडून चार-पाच पट मोबदला मिळेल, असा या गुंतवणूकदारांचा मनसुबा होता. परंतु तो नीती आयोगाच्या नकारामुळे उधळला गेला.अमरावती जिल्ह्यातील धारणी (मेळघाट) ते यवतमाळ जिल्ह्यातील करंजी असा मध्यप्रदेश ते आंध्रप्रदेशला जोडणारा राष्टष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यासाठी सर्वेक्षण, मोजणी व प्रस्तावांची प्रक्रिया सुरू होती. कुठे उड्डान पुल, कुठे बायपास, कुठे वळण, कुठे घाट समाप्ती याचा संपूर्ण अभ्यास करून सुमारे साडेतीन हजार कोटींचे बजेट असलेला हा रस्ता प्रस्तावित केला गेला होता. ही बाब डोळ्यापुढे ठेऊन अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील व राज्यातील गुंतवणूकदारांनी धारणी ते करंजी या मार्गावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गेल्या तीन-चार वर्षात कमी दरात जमिनींची खरेदी केली होती. जेथून बायपास जाणार तेथेही जमिनी घेतल्या गेल्या. कमी दरात या जमिनी घेऊन शासनाला भूसंपादनाच्या नावाखाली जास्त दरात विकण्याचा गुंतवणूकदारांचा मनसुबा होता. त्यात नागपूर-बोरी-तुळजापूर व वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील काही गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. परंतु नीती आयोगाने हा महामार्गच रद्द केल्याने या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. कारण धारणी ते करंजी हा महामार्ग रुंदीकरण न करता आहे त्याच स्थितीत बांधला जाणार आहे. पर्यायाने भूसंपादनाचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्यामुळे आज तरी ही गुंतवणूक फसल्याचे मानले जात आहे. या मार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये लागणार होते. अर्थात यातील बहुतांश रक्कम जमिनीचा मोबदला म्हणून त्या गुंतवणूकदारांच्या घशात जाणार होती. मात्र या पाचशे कोटींमुळेच नीती आयोगाने महामार्गास नकार दिला. धारणी-करंजीच्या धर्तीवर वरुड-मोर्शी-तिवसा-धामणगाव-बाभूळगाव-यवतमाळ या महामार्गासाठी चाचपणी सुरू होती. परंतु आता त्यालाही आपसुकच ब्रेक लागला आहे.दिल्लीत लॉबिंगनीती आयोगाने भूसंपादनासाठी पाचशे कोटी परवडणारे नाही, तेवढा निधी नाही असे कारण पुढे करून धारणी ते करंजी हा राष्ट्रीय महामार्ग रोखला असला तरी तो व्हावा यासाठी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची लॉबी सक्रिय झाली आहे. नागपूर-मुंबई-दिल्ली या मार्गाने हा राष्ट्रीय महामार्ग परत आणता येतो का या दृष्टीने या गुंतवणूकदारांच्या लॉबीचे राजकीयस्तरावरून ‘वजनदार’ प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.