शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पुसदच्या भाजीबाजाराने टाकली कात

By admin | Updated: December 25, 2016 02:39 IST

रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे भाजी व फळविक्री करणाऱ्या छोट्या येथील व्यावसायिकांसाठी आठवडी

विक्रेत्यांची सोय : नगरपरिषदेतर्फे नवीन २०० गाळ्यांची निर्मिती पुसद : रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे भाजी व फळविक्री करणाऱ्या छोट्या येथील व्यावसायिकांसाठी आठवडी बाजारातील जागेवर २०० नवीन गाळ्यांची नगरपरिषदेने निर्मिती केली आहे. त्यामुळे पुसदच्या भाजीबाजाराने कात टाकली आहे. रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्या भाजी व फळविक्रेत्यांची यामुळे सोय झाली आहे. त्यासोबतच शहरवासीयांनाही व्यवस्थित खरेदी करणे शक्य होणार आहे. पुसद शहरातील गांधी चौक ते आंबेडकर चौकादरम्यान भाजी विक्रेते व फळविक्रेते आपली हातगाडी रस्त्यावर लावून भाजी विक्री करतात. त्यामुळे या चौकादरम्यान वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण करून येथील रस्ता पूर्णत: अडवून धरला आहे. त्यामुळे येथील व्यापारी व वाहनचालकांमध्ये अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यासोबतच अपघाताच्या घटनाही अनेकवेळा घडल्या आहेत. या घटनांची दखल घेत पुसद नगरपरिषदेने येथील शहर पोलीस ठाण्यासमोरील आठवडीबाजारात तब्बल २०० गाळ्यांची निर्मिती केली. या गाळ्यांचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात तेथे विक्रेत्यांना आपला व्यवसाय सुरू करता येणार आहे. हे सर्व गाळे भाजीपाला व फळ विक्रेत्यांना नगरपरिषदेच्या नियमानुसार लवकरच देण्यात येणार आहे. संपूर्ण भाजी मार्केट व फळ मार्केट एकाच ठिकाणी आल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची मोठी सोय होणार आहे. पर्यायाने शहरवासीयांना गांधी चौक ते आंबेडकर चौकादरम्यान सातत्याने भेडसावणारा अतिक्रमण व विस्कळीत वाहतुकीचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)