शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

पुसदचे मार्केट यार्ड दरिद्री

By admin | Updated: June 5, 2016 02:11 IST

येथील बाजार समिती मार्केट यार्ड वर्षानुवर्षे दरिद्रीच राहिले आहे. शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षितता यासारख्या मूलभूत सुविधा येथे नाहीत.

शेतकऱ्यांना सुविधा नाही : पदाधिकारी प्रतिष्ठा जपण्यात मश्गुलपुसद : येथील बाजार समिती मार्केट यार्ड वर्षानुवर्षे दरिद्रीच राहिले आहे. शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षितता यासारख्या मूलभूत सुविधा येथे नाहीत. बाजार समितीचे पदाधिकारी पदासाठी प्रतिष्ठा पणाला लावत असतात. मात्र मार्केट यार्डाचा विकास होण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. एमआयडीसी परिसरातील नव्या मार्केट यार्डमध्ये तालुक्यातील शेती माल आणला जातो. त्याचे सौदे मोठ्या प्रमाणात होत असतात. पण या मार्केट यार्ड परिसरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. पिण्याचे थंड पाणी, शेतकरी भवन, चहापाण्यासाठी कॅन्टीन अशा कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. तालुक्यातून प्रतिहंगाम सोयाबीन, भुईमुगाची आवकही चांगल्या प्रकारची असते. परिसरातील शेतकऱ्यांचा येणारा माल व यापासून मिळणारे उत्पन्नही मोठे आहे. तरी येथील समस्या वाढतच आहेत. पुसदचे मार्केट यार्ड दिवसेंदिवस दरिद्री होत चालले आहे. प्रशासनाने व नवीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठेबरोबरच मार्केट यार्डाचीदेखील प्रतिष्ठा सुधारणे गरजेचे आहे. सदर प्रतिनिधीने मार्केट यार्डचा फेरफटका मारला असता २ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची शेंग पाण्यामुळे भिजली. बाजार समितीचे सभापती किंवा सचिवसुद्धा फिरकले नाही. वाशिम, मानोरा येथील मार्केटमध्ये रात्री १२ वाजतापर्यंत काटे चालतात. पुसदमध्ये सायंकाळी ७ वाजता काटे बंद आणि ६ वाजताच्या नंतर सर्व गाड्या येणे बंद होते. कास्तकारांसाठी व्यवस्थित हॉटेलसुद्धा नाही. पाच कि़मी. पायी जालन जेवण करावे लागते. सचिव व पदाधिकारी याची दखल घेत नाही, असे मरसूळ येथील शेतकरी काशिराम जाधव यांनी सांगितले. वाशिम, मानोरा व अनसिंग यार्डमध्ये जाग्यावर काटे होतात. कास्तकारांना सर्व व्यवस्थित सवलती देतात. पुसद शिवारातील ८० टक्के माल बाहेर जातो, केवळ २० टक्के माल येतो, असे मुंगशी येथील मधुकर चव्हाण, सुभाष चव्हाण, कार्ला येथील शामराव राठोड यांनी सांगितले.पुसदपेक्षा लहान असलेल्या मनोरा येथील मार्केट यार्डमध्ये अद्ययावत शेतकरी भवन, सीसीटीव्ही कॅमेरे, थंड पेयजलाची व्यवस्था या उपर मालाचा काटा झाल्याबरोबर ताबडतोब पैसे दिल्या जाते. तर पुसदमध्ये अडत्यांना व्यापारी व्यवस्थित पैसे देत नाही, असे बांशी येथील गजानन मारकड व वसंता मारकड, बोरगडीचे पांडुरंग साखरे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)