शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पुसदचे डॉक्टर निकृष्ट रस्त्याविरोधात रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : पुसदच्या डॉक्टर लेनला जोडणाºया सुमारे एक किलोमीटर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात डॉक्टर मंडळी रस्त्यावर उतरली ...

ठळक मुद्देनगरपरिषदेचा कारभार : निकृष्ट बांधकाम, जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना अहवाल मागितला

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पुसदच्या डॉक्टर लेनला जोडणाºया सुमारे एक किलोमीटर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात डॉक्टर मंडळी रस्त्यावर उतरली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी पुसद सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.पुसद नगरपरिषदेतील बांधकाम विभागाचा गोंधळ नेहमीच चर्चेत राहिला आहे. ‘टक्केवारी’च्या गणिताआड बांधकामाच्या गुणवत्तेला नेहमीच मूठमाती दिली गेली आहे. पुसद शहरातील शिवाजी चौक ते मुखरे चौक या एक कोटींच्या रस्त्याचे बांधकाम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले. नगरपरिषदेच्या या कामाला यवतमाळच्या बांधकाम अधीक्षक अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली. जुना पाच मीटरचा रस्ता रूंदीकरण करून साडेसात मीटर करण्याचा हा प्रस्ताव होता. हा संपूर्ण रस्ता डांबरी करायचा होता. या रस्त्यावर बहुतांश डॉक्टरांचे दवाखाने, न्यायालयाची इमारत आहे. पुसदच्या बी.के. कंस्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले. परंतु सुरुवातीपासूनच या कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या दोनही बाजूने साईडपट्ट्यांचे खोदकाम करून तेथे नव्याने पक्के काम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात साधा कच्चा रस्ता (डब्ल्यूबीएम) करून त्यावरच पुढील काम करण्यात आले. वास्तविक तेथे वार्इंडींग करणे बंधनकारक होते. यासर्व कामाच्या गुणवत्तेबाबत संशय असल्याने त्या मार्गावरील डॉक्टरांनी खासगी एक्सपर्ट बोलावून रस्त्याची पाहणी तथा तपासणी केली. तेव्हा साईडपट्ट्यांचे कामच झाले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. नगरपरिषदेचे काम असल्याने या डॉक्टरांनी पालिकेच्या राजकीय प्रमुखांकडे धाव घेतली. मात्र तुम्ही भाजपाचे आहात, जाणीवपूर्वक आमच्याविरोधात तक्रारी करता, अशा शब्दात त्यांना सुनावले गेले. अखेर या डॉक्टरांनी नुकतीच यवतमाळात जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावर जिल्हाधिकाºयांनी पुसदच्या सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंत्यांना कामाची तपासणी करून अहवाल मागितला आहे. नगरपरिषदेचे शाखा अभियंता व त्यांच्या अधिनस्त कनिष्ठावर हे प्रकरण शेकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष असे, या प्रकरणाचा पॉझिटीव्ह आणि तत्काळ अहवाल द्यावा म्हणून कार्यकारी अभियंत्याकडे नगरपरिषदेतून राजकीय मोर्चेबांधणीही सुरू झाल्याची माहिती आहे. गुरुवारी पालिकेच्या एका पदाधिकाºयाने त्यासाठी अभियंत्याची भेट घेऊन ‘माझ्यासाठी एवढे करा’ असे म्हणून साकडे घातल्याची माहिती आहे. एक कोटी रुपये बजेट असलेले हे काम दोन महिन्यांपासून सुरू झाले आहे. त्यापोटी सुमारे २५ ते ३० लाखांचे देयक देण्यातही आल्याचे बोलले जाते. या रस्त्याच्या अनुषंगाने नगरपरिषदेच्या अभियंत्यांनी नेमके काय रेकॉर्ड लिहिले, याची विचारणा केली असता संबंधितांनी ‘एमबी’ (मोजमाप पुस्तिका) रेकॉर्ड केली नसल्याचे चौकशी अधिकाºयाला सांगितले. रेकॉर्डच बनले नसेल तर २५ ते ३० लाखांचे पेमेंट केले कसे, हा मुद्दा उपस्थित होतो आहे.‘एसर्इं’ना अंधारात ठेऊन परस्पर तांत्रिक बदलनगरपरिषदेच्या एक कोटींच्या या रस्त्याला अधीक्षक अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. आता साईडपट्ट्या न खोदता बांधकाम का केले, या प्रश्नाच्या बचावार्थ नगरपरिषदेचे पदाधिकारी ‘तेथे हार्ड मुरूम होता, त्यामुळे गरज भासली नाही’ असा बचाव घेत आहेत. वास्तविक या बदलासाठी कंत्राटदार व पालिका अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्यांची पुन्हा तांत्रिक मंजूरी घेणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न करता परस्परच आपल्या सोयीने हे काम फिरविले गेले, हे विशेष. या बदलात पालिकेचे अभियंते अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर