शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

पुसदकरांना आता मुबलक पाणी

By admin | Updated: August 7, 2015 02:24 IST

नगरपरिषदेने १३ व्या वित्त आयोगाच्या दोन कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानातून २० लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचे बांधकाम केले...

पाणीपुरवठा सभापती : नगर परिषदेने बांधला नवीन जलकुंभपुसद : नगरपरिषदेने १३ व्या वित्त आयोगाच्या दोन कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानातून २० लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचे बांधकाम केले असून सदर जलकुंभ आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या जलकुंभातून पुसदकरांना मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी सांगितले.पुसद शहरात पूर्वी दिवसातून दोनवेळा पाणीपुरवठा होत होता. मात्र जुन्या टाकीचा ढाचा नादुरुस्त झाल्याने नगरपरिषदेने एकाच टाकीवरून पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी लागली. तसेच पाणीपुरवठा कमी आणि अनियमितही होत होता. त्यामुळे नवीन जलकुंभ उभारण्याची मागणी पुढे आली. आमदार मनोहरराव नाईक मंत्री असताना नवीन जलकुंभाच्या उभारणीसाठी १३ व्या वित्त आयोगातून अडीच कोटी अनुदान मंजूर झाले होते. या निधीतून एका वर्षात नवीन जलकुंभाचे काम पूर्णत्वास गेले आहे. आता सर्व परिसरातील पाईप लाईन जोडणीचे काम सुरू आहे. हेही काम पूर्णत्वास येणार असून पुसदकरांना मुबलक पाणी देण्याचा मानस असल्याचे सभापती दुधे यांनी सांगितले.जुनी टाकी पाडून त्या ठिकाणी तिसरी नवीन पाणी टाकी बांधण्यात येणार आहे. तिसऱ्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना दिवसातून दोनवेळा पाणीपुरवठा नियमितपणे केला जाणार आहे. यासाठी ग्राहकांनी नगरपरिषदेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. नियमित नळबिलाचा भरणा करण्याची आवश्यकता आहे. पुसद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात ३२ टक्के जलसाठा असून भविष्यात समाधानकारक पाऊस झाल्यास धरणाची पातळी वाढेल आणि पुसदकरांना मुबलक पाणी मिळेल, असेही दुधे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)