शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहर रस्ता रुंदीकरणात प्रचंड दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:13 IST

शहरातील वाशिम मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते विश्रामगृह या रस्ता रुंदीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत आहे. कंत्राटदाराने रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

ठळक मुद्देशिवाजी चौक ते विश्रामगृह : पुसद वाहतूक शाखेचे बांधकामला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरातील वाशिम मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते विश्रामगृह या रस्ता रुंदीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत आहे. कंत्राटदाराने रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सण-उत्सवाच्या काळात शहरात मोठी गर्दी होत असून हा अडथळा दूर करावा, अन्यथा होणाºया परिणामाला जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र पुसद वाहतूक शाखेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.पुसद शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते विश्रामगृह या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामात प्रचंड दिरंगाई होत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्त्यावर बांधकाम साहित्य पडले आहे. मोठ्ठाल्या डब्बरचे ढिग रस्त्याच्या कडेला आहे. तसेच वीज खांबही वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. पुसद शहर संवेदनशील असून आगामी काळात गणेश विसर्जन, बकरी ईद, नवरात्र उत्सव येत आहे. परंतु कंत्राटदाराच्या दिरंगाईने विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर रस्त्यावर असलेल्या अडथळ्यांमुळे विसर्जन मिरवणुकीला अडथळा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे गणेश विसर्जनापूर्वी या रस्त्यावरील अडथळे दूर करावे. एखादा अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, असे पत्र बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. सदर पत्र वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी दिले आहे. आता बांधकाम विभाग काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.