शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या आजाराने पुसद तालुका बेजार

By admin | Updated: August 10, 2014 23:14 IST

कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरीमध्येच कडक ऊन्ह. रात्रीच्या वेळी थंडी अशा बदलत्या हवामानाचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

पुसद : कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरीमध्येच कडक ऊन्ह. रात्रीच्या वेळी थंडी अशा बदलत्या हवामानाचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत अतिसार, हगवण, मलेरिया, थंडी, ताप, सर्दी, खोकला आदी आजाराने आबाल-वृद्ध त्रस्त झाले आहेत. पावसाचे अपेक्षित प्रमाण नसल्याने वातावरणात दमट हवामान निर्माण होऊन आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल दिसत आहे.पुसद शहरातील उपजिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुक्यातील सहाही प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करून घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना डायरियाची लागण झाली आहे. एकंदरित तालुक्यात साथरोगाने थैमान घातले असताना प्रशासन मात्र सुस्तावले आहे. प्रशासकीय स्तरावर कोणतीही बैठक घेण्यात आली नाही, आरोग्य विभागाची यंत्रणा पूर्णपणे ठप्प पडलेली आहे. आजवर कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. आम्हाला प्रशासकीय आदेश नसल्याने आम्ही काहीही करू शकत नाही असे म्हणत आरोग्य अधिकारी आपली जबाबदारी टाळत आहे. सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात अनेक रुग्णालय असतानाही उपजिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी धाव घेताना दिसत आहेत. सध्या चांगला पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यातील दोष यामुळे शहरासह तालुक्यात अनेकांना आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. शहरात साथीच्या आजारात मोडल्या जाणाऱ्या ताप, सर्दी आदी आजाराची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. शहरासह तालुकाभर अधून-मधून रिमझिम पाऊस त्यात सतत पावसाचे होणारे वातावरण आणि अचानक पडणारे ऊन यामुळे पाच ते सहा दिवसापासून वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी आरोग्य विभाग मात्र गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)