शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पुसदला १२ लाखांचे सागवान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 21:55 IST

पुसद वनपरिक्षेत्रांतर्गत खंडाळा वनवर्तुळातील अमृतनगरात पोलीस, वन व महसूलच्या संयुक्त पथकाने घराघरात सर्च करून सुमारे १२ लाख रुपयांचे सागवान जप्त केले. सोमवारी केल्या गेलेल्या या संयुक्त कारवाईने सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहे. गेल्या कित्येक वर्षात पुसद विभागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली गेली.

ठळक मुद्देसंयुक्त कारवाई : खंडाळा वनवर्तुळातील अमृतनगरात घराघरांत ‘सर्च’
<p>लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पुसद वनपरिक्षेत्रांतर्गत खंडाळा वनवर्तुळातील अमृतनगरात पोलीस, वन व महसूलच्या संयुक्त पथकाने घराघरात सर्च करून सुमारे १२ लाख रुपयांचे सागवान जप्त केले. सोमवारी केल्या गेलेल्या या संयुक्त कारवाईने सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहे. गेल्या कित्येक वर्षात पुसद विभागात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात धडक कारवाई केली गेली.पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे (आयएफएस) यांच्या मार्गदर्शनात सागवान तस्करांवर जरब बसविणारा हा सर्च राबविला गेला. वन क्षेत्रनिहाय कर्मचाऱ्यांची चमू तयार करून अमृतनगरात घरोघरी झडती घेण्यात आली. प्रत्येक वन पथकासोबत पाच पोलीस कर्मचारी व दोन केंद्रीय राखीव दलाचे जवान देण्यात आले होते. या तपासणीत अवैध तोडीचा सागवान (गोल माल), चौरस नग व त्यापासून तयार केलेले पलंग, चारपाई जप्त करण्यात आल्या. हा माल येलदरी तपासणी नाक्यावर साठविण्यात आला. सदर सागवान अंदाजे २५ ते ३० घनमीटर असून बाजार भावानुसार त्याची किंमत १० ते १२ लाख रुपये आहे.सहायक वनसंरक्षक बी.एन. पायघन, सहायक वनसंरक्षक बी.के. करे, उमरखेड उपविभागीय वनअधिकारी अमोल थोरात, पुसदचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. गिरी, मारवाडीचे डी.जी. पवार, शेंबाळपिंपरीचे एस.एस. सावंत, महागावचे हेमंत उबाळे, काळी (दौ.)चे एस.एस.पवार, फिरत्या पथकाचे आर.जी. रत्नपारखी, खंडाळाचे ठाणेदार ठाकूर आदींच्या नेतृत्वात ही कारवाई केली गेली.१७ जुलै रोजी राबविलेल्या सर्चमध्ये अनेक घरात अवैध सागवान असल्याचे आढळून आले होते. हे सागवान जप्त करण्यासाठी वन विभागाने महसूल व पोलीस अधिकाºयांच्या मदतीने हा सर्च केला.