शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुसद विभागाला १६ कोटींचा पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:08 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसद विभागात येणाऱ्या पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील शाखेत शेतकऱ्याचे पीक विम्याचे १६ कोटी तीन लाख तीन हजार रूपये जमा झाले.

ठळक मुद्देपॅनकार्डच्या सक्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष : पोफाळी येथील जिल्हा बँकेसमोर शेतकऱ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसद विभागात येणाऱ्या पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील शाखेत शेतकऱ्याचे पीक विम्याचे १६ कोटी तीन लाख तीन हजार रूपये जमा झाले. मात्र पॅनकार्ड नसणाऱ्या शेतकऱ्यांना विमयची रक्मे मिळणे अवघड झाले आहे. त्यांना परत पाटविले जात असल्याने शेतकऱ्यांमधये प्रचंड असंतोष खदखदत आहे.पुसद विभागातील जिल्हा बँकेच्या शाखेत पीक विम्याचे पैषसे जमा झाले. गेल्यावर्षी विमा कंपनीकडे पुसद विभागातील हजारो शेतकºयांनी विमा हप्ता भरला होता. पुसद विभागात जिल्हा बँकेच्या १७ शाखा आहेत. त्यात पुसद, बेलोरा, गौळ, जांबबाजार, काकडदाती, शेंबाळपिंपरी, उमरखेड, ढाणकी, मुळावा, साखरा, पोफाळी, चिखली, महागाव, काळी दौ., पिपळगाव, हिवरा, फुलसंवगी यांचा समावेश आहे. यापैकी नऊ शाखेत विम्याचे १६ कोटी जमा झाले. ही रक्कम काढण्यासाठी शेतकरी बँकेकडे धाव घेत आहे. मात्र बँक शेतकºयांना पॅनकार्ड मागत आहे. पॅनकार्ड खात्याला लिंक असले, तरच पैसे विड्राल होत आहे.या तिही तालुक्यात पॅनकार्डधारक शेतकरी अत्यंत कमी आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळणे दुर्लभ झाले आहे. जिल्हा बँकेने पॅनकार्डची सक्ती केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हक्काचे पैसे असूनही ते मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा बँकेने याबाबत शेतकरी हिताचे धोरण स्वीकारून सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. त्यासाटी वरिष्ठांकडे लक्ष लागले आहे.१७ शाखांमध्ये शेतकऱ्यांना त्रासपुसद विभागातील पुसद, महागाव आणि उमरखेड तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळपास १७ शाखा आहेत. या सर्वच शाखांनी विम्याची मदत मिळण्यासाठी पॅनकार्डची सक्ती केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. या शाखेत दोन कोटी १८ लाख रुपये जमा झाले. मात्र पोफाळी, दिवट पिंपरी, पळशी, अंबाळी, कळमुला, तरोडा, गगनमाळ, कुपटी येथील सुमारे दोन हजार शेतकºयांकडे पॅनकार्ड नाही. केवळ ३०० पॅनकार्डधारक शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळाला. उर्वरित शेतकरी अद्यापही वंचित आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडताना व ज्या ग्राहकांचे खाते बँकेत आहे, त्यांना पैसे काढण्यासाठी पॅनकार्ड लिंक करणे आवश्यक आहे. ज्यांचे पॅनकार्ड लिंक आहे, त्यांना वाटप सुरू आहे. ग्राहकांनी तत्काळ पॅनकार्ड काढणे जरुरी आहे.- डी .सी . राठोडपुसद विभाग प्रमुखजिल्हा मध्यवर्ती बॅक