शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

पुसद पोलीस ‘शाहरूख’च्या शोधात

By admin | Updated: November 1, 2015 02:49 IST

बांगलादेशींना पुसदमधून बनावट रहिवासी दाखले मिळवून देण्यासाठी शाहरूख नामक व्यक्तीने दोन तोतयांना सेतू केंद्रात उभे केले होते, ..

बांगलादेशींचे प्रकरण : दोन तोतयांचा सहभागही झाला उघडपुसद : बांगलादेशींना पुसदमधून बनावट रहिवासी दाखले मिळवून देण्यासाठी शाहरूख नामक व्यक्तीने दोन तोतयांना सेतू केंद्रात उभे केले होते, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी तो शाहरूख कोण, याचा शोध चालविला आहे.दोन बांगलादेशींचे भारतियत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना पुसद तालुक्यातील वेणी(खुर्द)च्या महाई-सेवा केंद्रातून कागदपत्रे उपलब्ध करून दिली गेली. पोलीस तपासात पुसदच्या वसंतनगर परिसरातील शाहरूख नामक व्यक्तीने अज्ञात दोघांना सेतू केंद्रात उभे केले होते. त्यांची ओळख मो. आजीम व हबीब शेख अशी सांगण्यात आली. त्यावरून त्यांना सेतू केंद्रातून कागदपत्रे दिली गेली. पोलिसांनी हा शाहरूख नेमका कोण, आणि त्यांनी उभे केलेले ते तोतये दोन जण कोण, याचा शोध चालविला आहे. दरम्यान, ई-सेवा केंद्राच्या संचालकासह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान शाहरूखचे नाव पुढे आले. आता शाहरूखच्या अटकेनंतर त्याने उभे केलेल्या दोन तोतयांची नावे उघड होतील. शिवाय बांगलादेशींना पुसदमधून बनावट प्रमाणपत्र मिळवून देण्याची जबाबदारी शाहरूखवर नेमकी कुणी सोपविली, ही बाब या प्रकरणात सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. त्या व्यक्तीचा पर्दाफाश करण्यासाठी पुसद ग्रामीणचे ठाणेदार अनिल कुरळकर व पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)