लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. विजय जाजू यांची निवड करण्यात आली असून एका कार्यक्रमात पदग्रहण सोहळा पार पडला.अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, ठाणेदार धनंजय सायरे, डॉ. यादवराव सूर्यवंशी, डॉ.वीरेन पापळकर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डॉ. दयाराम जाधव यांनी अध्यक्षपदाचा प्रभार डॉ. विजय जाजू यांच्याकडे सोपविला. मावळते सचिव जय भोपी यांनी नवनियुक्त सचिव डॉ. संजय पेंशलवार यांच्याकडे पदभार दिला. नवनियुक्त कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉ. संजय भांगडे, सहसचिव डॉ. अनिल राठोड, डॉ. मिलिंद तगडपल्लेवार, कोषाध्यक्ष डॉ. तुषार देशपांडे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाला डॉ.संजय अग्रवाल, डॉ. आनंद कोमावार, डॉ. राहुल भगत, डॉ. राजेश वाढवे, डॉ. शीतल भंडारी, डॉ. सारिका नाईक, डॉ. संतोष रेवणवार, डॉ. अमेय तगलपल्लेवार, डॉ. रितेश जारंडे, डॉ. मनीष देशमुख, डॉ. मधुकर नाईक, डॉ. चंचल गाजीयानी, डॉ. सुहासिनी भोपी, डॉ. अस्मिता मालपानी, डॉ. बिरबल पवार, डॉ. सुनील राठोड, डॉ. अकील मेमन, डॉ. सुरेंद्र बिलोलीकर, डॉ. स्वप्नील देशमुख, डॉ. उत्तम खांबाळकर, डॉ. उमेश रेवणवार उपस्थित होते.
पुसद आयएमएचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:45 IST