शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये सिग्नल आणि वाहनतळच नाही

By admin | Updated: March 11, 2017 01:00 IST

एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नसून वाहनतळांचाही थांगपत्ता लागत नाही.

वाहतुकीची कोंडी : रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग, अपघातात वाढ, सिग्नलसाठी नगरपरिषदेकडे प्रस्ताव पुसद : एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नसून वाहनतळांचाही थांगपत्ता लागत नाही. परिणामी शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली असून याचा ताण वाहतूक शाखेसह नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. पुसद शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या लाखाच्या आसपास आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारी वाहनांची संख्या शहरात समस्या निर्माण करीत आहे. पुसद शहरातील रस्ते आधीच अरुंद असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडतात. शहरात कुठेही ट्रॅफिक सिग्नल लावलेले नाही. वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करावी लागते. परंतु शहरातील रस्त्यावरील हातगाड्यांना बाजूला सारतानाच त्यांची शक्ती खर्च होते, तर काही चौकात वाहतूक पोलीसच दिसत नाही. येथील गजबजलेल्या शिवाजी चौकात चारही बाजूने येणारी वाहने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वळसा घालतात. त्यावेळी अपघात होण्याची शक्यता असते. भरधाव वाहनांच्या मध्ये पायदळ चालणाऱ्यांचाही गोंधळ सुरू असतो. शहरातील बसस्थानकासमोर आॅटोरिक्षाचालकांचा कायम धुमाकूळ सुरू असतो. विक्रेत्यांनी आपली दुकाने थेट डांबरी रस्त्यालगत लावली आहे. आधीच दुभाजकामुळे रस्ता अरुंद झाला असून या दुकानांमुळे पायदळ चालणाऱ्यांना थेट रस्त्याच्या मधोमध चालावे लागते. त्यामुळे येणाऱ्या वाहनांना अडचणीचे जाते. तसेच खरेदी व इतर व्यवहारासाठी येणारे नागरिकही रस्त्यावरच वाहने उभी करतात. कारण पार्कींगसाठी आवश्यक जागाच सोडण्यात आली नाही. ही समस्या गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे. यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील इतरही परिसरात अशीच अवस्था दिसून येते. भरधाव जाणाऱ्या दुचाकी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवितात. पुसद शहरातील शिवाजी चौक आणि बसस्थानकासमोर ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता आहे. या ठिकाणी सिग्नल लावल्यास स्वयंचलित पद्धतीने वाहतूक नियंत्रित होवू शकते. यासाठी येथील वाहतूक उपशाखेने नगरपरिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्याप तरी या प्रस्तावावर उपाययोजना झाली नाही. तसेच शहरात अपवाद वगळता कुठेही वाहनतळ दिसत नाही. केवळ बसस्थानकाच्या आवारात वाहनतळ आहे. शहरात इतर ठिकाणी कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. बाजारात खरेदीसाठी चारचाकी वाहन घेवून जाणे म्हणजे अंगावर काटा आणण्यासारखा प्रकार आहे. वाहन पार्किंग करताना जागेची शोधाशोध करण्याच्या वेळात खरेदी होवू शकते. त्यामुळे अनेकजण चारचाकी वाहनाऐवजी दुचाकीनेच बाजारात येतात. परंतु दुचाकी उभी करतानाही दुकानदार आणि इतरांचे बोलणे ऐकावे लागते. (कार्यालय चमू)