शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

पुसद वनविभाग होतोय वाळवंट

By admin | Updated: September 25, 2014 23:34 IST

आंध्रप्रदेशातील सराईत सागवान तस्करांनी स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून सागवानाची बेसुमार कत्तल चालविली आहे. पुसद वन विभागांतर्गत अलिकडच्या काळात उघडकीस आलेल्या घटनांवरून घनदाट

अशोक काकडे - पुसद आंध्रप्रदेशातील सराईत सागवान तस्करांनी स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून सागवानाची बेसुमार कत्तल चालविली आहे. पुसद वन विभागांतर्गत अलिकडच्या काळात उघडकीस आलेल्या घटनांवरून घनदाट जंगल वाळवंट होण्याची भीती होत आहे. दोन दिवसापूर्वी उघडकीस आलेल्या सागवान तस्करीने तर यावर शिक्कामोर्तबच केले आहे. पुसद उपविभागातील पुसद, उमरखेड, महागाव या परिसरात मौल्यवान सागवान मोठ्या प्रमाणात आहे. या सागवानावर आंध्रप्रदेशातील सागवान तस्करांची गेल्या कित्येक वर्षांपासून वक्रदृष्टी आहे. वाहनांद्वारे येऊन चक्क मशीनच्या सहाय्याने सागवानाची कत्तल करतात आणि रातोरात आंध्रप्रदेशात सागवान पोहोचविला जातो. या प्रकाराला स्थानिक सराईत तस्करांच्या टोळ्याही सहकार्य करीत असल्याची माहिती आहे. वारंवार घडणाऱ्या सागवान तस्करीमुळे वनविभागाची लक्तरे वेशीवर टांगली जातात. वन अधिकाऱ्यांची बैठक चिखली येथे सुरू असताना आंध्रप्रदेशातील सागवान तस्कर मात्र जंगलात सागवान तोडत होते. सुदैवाने मोठी टोळी वनविभागाच्या हाती लागली. यापूर्वीही अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. वर्षभरापूर्वी पुसद वनपरिक्षेत्रातून सागवान घेऊन जाणारी टाटा सुमो वन विभागाच्या हाती लागली होती. या वाहनात १.०८२ घनमीटर सागवान होते. जुलै महिन्यात महागाव, उमरखेड मार्गावरील नांदगव्हाण वनकुटीजवळ नऊ ते दहा सागवान वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली. त्यासोबतच दर्यापूर- बोरगाव बीटमध्येही कत्तल उघडकीस आली होती. मे महिन्यात खंडाळा राऊंडमध्ये २० ते २२ साग वृक्षाची अवैध कत्तल झाली होती. आॅगस्ट महिन्याच्या १३ तारखेला पुसद वनपरिक्षेत्रांतर्गत खंडाळा सर्कलमधून सागवानाचे २९ नग घेऊन जाणारा मेटॅडोअर पकडण्यात आला होता. या घटना उघडकीस आल्या म्हणून माहीत झाल्या. परंतु दररोज शेकडो वृक्षांची कत्तल केली जाते आणि बिनबोभाट आंध्रप्रदेशात या सागवानाची खेप पोहोचविली जाते. या सर्व प्रकाराला वरिष्ठांसह वनरक्षक आणि वनपालांचा तस्करांशी असलेला संबंधच कारणीभूत असल्याची चर्चा आहे.