शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

११00 गावांवर साथीचे सावट

By admin | Updated: June 8, 2014 00:09 IST

प्राथमिक आरोग्य केंद्राने पाणी नमूने घेतले. प्रयोगशाळेतून तपासणी केली. यात एक हजार शंभर गावातील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित गावच्या ग्रामपंचायतींना आरोग्य यंत्रणेने उपाययोजना करण्याचे

दूषित पाणी :  ग्रामपंचायतींनी मान्सूनपूर्व उपाययोजना टाळल्यायवतमाळ : प्राथमिक आरोग्य केंद्राने पाणी नमूने घेतले. प्रयोगशाळेतून तपासणी केली. यात एक हजार शंभर गावातील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित गावच्या ग्रामपंचायतींना आरोग्य यंत्रणेने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. परंतु नागरिकांच्या आरोग्याप्रती नेहमीच उदासीन असणार्‍या ग्रामपंचायतींनी आदेश धुडकावले. आता या गावातील हजारो नागरिकांना साथरोगाचा धोका आहे. तसा इशारा आरोग्य यंत्रणेने दिला आहे.जिल्ह्यातील दोन हजार ४0 गावांमध्ये सात हजार पाण्याचे स्रोत आहे. या पानवठय़ांचे मान्सूनपूर्व निरीक्षण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राने पाण्याचे नमूने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविले. याचा अहवाल आरोग्य विभागाला नुकताच प्राप्त झाला. यानुसार एक हजार शंभर गावांमधील पाणी अधिक दूषित आहे. दूषित पाण्याचा धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले. सर्वाधिक धोकादायक, मध्यम आणि दूषित अशी पाण्याची परिणामकारकता ठरविण्यात आली. त्यासाठी विशिष्ट रंगाचा वापर करण्यात आला. हिरवे कार्ड, पिवळे कार्ड आणि लाल कार्ड अशा तीन प्रकारात परिणामकारकता ठरविली. यानुसार सर्वाधिक धोकादायक असलेल्या ३७ ग्रामपंचायतीला रेड कार्ड देण्यात आले. मध्यम स्वरूपाचे पाणी असलेल्या ६२२ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड तर, दूषित पाणी असलेल्या ५४३ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले.तिनही प्रकारात विभागणी केलेल्या कार्डमध्ये पाणीपुरवठा दूषित असल्याचे नमूद आहे. याठिकाणी पावसाळ्यात हमखास साथरोग पसरण्याचा धोका आहे. सदर गावांमध्ये साथरोग पसरून स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तत्काळ पावले उचलण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेने दिले आहे. मात्र ग्रामपंचायती हा विषय गांभीर्याने घेण्यास तयार नाही. यातून या गावांमध्ये साथरोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.  (शहर वार्ताहर)