शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वणीत धान्य खरेदीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:48 IST

बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूपयांचे धान्य जप्त केले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूपयांचे धान्य जप्त केले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या पथकाने ही कारवाई केली.सध्या सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्याने बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. कृषी पणन नियमानुसार शेतकºयांना आपला माल बाजार समितीच्यामार्फतच विकावा लागतो. बाजार समितीला व शासनाला त्यामधून सेस प्राप्त होतो. मात्र मागील आठवड्यापासून शहरात विविध ठिकाणी बाजार समितीला डावलून काही व्यापारी अवैधपणे धान्य खरेदी करीत आहे. ही माहिती बाजार समितीला मिळाल्यावरून बाजार समितीच्या पथकाने शहरातील काही प्रतिष्ठानांवर धाड टाकली. त्यामध्ये अवैधपणे धान्य खरेदी करताना आढळल्याने बाजार समितीने नियमानुसार कारवाई केली. पहिली धाड लालगुडा परिसरातील रामदेव ट्रेडर्सवर टाकण्यात आली. तेथे अवैधपणे खरेदी केलेले ५० लाख रूपयांचे एक हजार ५०० क्विंटल सोयाबीन पथकाच्या हाती लागले. त्यानंतर आंबेडकर चौकामधील राजू निंबाळकर यांच्या दुकानातून ३० क्विंटल सोयाबीन व तीन क्विंटल तूर पथकाला मिळाली, तर नांदेपेरा मार्गावरील एका मंगल कार्यालयासमोर असलेल्या प्रतिष्ठानात १७ क्विंटल सोयाबीन दुकानाच्या बाहेर ठेवलेले आढळून आले. दुकानदाराला धाडीची कुणकुण लागताच त्याने दुकानातील शटर बंद करून तेथून पोबारा केला. वृत्त लिहीपर्यंत धान्य जप्तीची कारवाई सुरूच होती. भरारी पथकांमध्ये सचिव अशोक झाडे, रमेश पुरी, अशोक घुगुल, कैलास कारगीरवार, सुनील निमजे, परशुराम अहीरकर, आरिफ खान, मनोज वैद्य यांचा समावेश होता. या तिनही व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या नोटीस देऊन सेस, बाजार फी व दंड भरण्यास सांगण्यात येणार आहे. तो न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असे सचिव अशोक झाडे यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी माल बाजार समितीतर्फेच विकावा - संतोष कुचनकारशेतकऱ्यांनी आपला शेतमाल अवैधपणे कोणत्याही व्यापाºयाला न विकता तो बाजार समितीतर्फेच विकावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकार यांनी शेतकºयांना केले आहे. पुढे शासनाने कोणत्याही दिलेल्या योजनेपासून शेतकरी वंचित राहू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी स्वत:चे नुकसान करून घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.