शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आदेश येईपर्यंत नोंदणीकृत तुरीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:28 IST

केंद्र सरकारचा आदेश येईपर्यंत शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेल्या तुरीची खरेदी सुरू राहणार आहे. या तुरीसाठी गोदाम भाडेतत्वावर घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

ठळक मुद्देगोदाम भाडेतत्वावर घेण्याची सूचना : जिल्ह्यात ३३ हजार शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र सरकारचा आदेश येईपर्यंत शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केलेल्या तुरीची खरेदी सुरू राहणार आहे. या तुरीसाठी गोदाम भाडेतत्वावर घेण्याची सूचना देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३३ हजार शेतकरी आजही तूर विक्रीच्या प्रतीक्षेत असून त्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.संपूर्ण राज्यात तूर खरेदी १८ एप्रिलनंतर बंद करण्याचे निर्देश सुरुवातीला देण्यात आले होते. परंतु या कालावधीत केवळ २० टक्केच तुरीची खरेदी करता आली. त्यामुळे राज्याने केंद्र सरकारला तूर खरेदीची मुदत वाढविण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला मंजुरी मिळेपर्यंत राज्यात तुरीची खरेदी होणार आहे. १८ एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर नाफेडच्या खरेदी केंद्रावर स्वीकारली जाणार आहे. यावर्षी तूर साठविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता खरेदी केलेली तूर कुठे ठेवावी, असा प्रश्न आहे. त्यामुळे खासगी गोदाम भाडे तत्वावर घेण्याची सूचना संंबंधितांना सहकार विभागाने दिली आहे.यवतमाळ जिल्ह्यात खरेदी झालेली तूर ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. गोदामासाठी वखार महामंडळाने अमरावतीच्या केंद्रीय वखार महामंडळाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच जिल्ह्यातील तूर त्या ठिकाणी वळती केली जाणार आहे. जिल्ह्यातील ३३ हजार शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. साडेतीन लाख क्ंिवटल तूर आजही शेतकºयांच्या घरी आहे. त्यातच १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद होणार असल्याने शेतकºयांची चिंता वाढली होती. मात्र आता केंद्राचा आदेश येईपर्यंत नोंदणीकृत तूर खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.