शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

दर कराराआड निकृष्ट कृषी साहित्य खरेदी

By admin | Updated: June 1, 2016 00:04 IST

शासनाच्या दर कराराआड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने निकृष्ट साहित्य खरेदी केल्याची विश्वसनीय माहिती असून ...

सात कोटींचे घबाड : जिल्हा परिषद कृषी विभागाचा प्रतापयवतमाळ : शासनाच्या दर कराराआड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने निकृष्ट साहित्य खरेदी केल्याची विश्वसनीय माहिती असून यात पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेतले नसल्याची माहिती आहे. विशेष घटक योजनेतून तब्बल सहा कोटी ७८ लाखांचे निकृष्ट साहित्य शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले असून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातच कृषीच्या योजनांना सुरुंग लावला जात आहे. शासनाकडून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेअंतर्गत कृषी साहित्य पुरविण्यात येते. ही योजना जिल्हा परिषद कृषी विभागाकडून राबविली जाते. २०१३-१४ आणि २०१४-१५ आर्थिक वर्षातील सहा कोटी ७८ लाखांच्या साहित्याची खरेदी केली. यात शेतकऱ्यांना दुय्यम दर्जाचे साहित्य देण्यात आले. ज्या साहित्याला अधिक मागणी त्याचाच पुरवठा कमी करण्यात आला आहे. दातेरी विळा, कॉटन प्लांटर, डवरा, बैलगाडी आणि एसडीपी पाईप देण्यात आले. बैलजोडी, मोटरपंप हे साहित्य अपवादाने वाटण्यात आले आहेत. विहिरीचे अनुदान केवळ एक लाख आहे, त्यात खोदकाम शक्य नाही, ही सबब पुढे करून टाळण्यात आले, अनेकांना रोजगार हमी योजनेतून विहिरी घेण्याचा सल्ला देण्यात आला. २०१५-१६ या आर्थिक वर्षात केवळ वणी पंचायत समिती मोटरपंप देण्यात आले आहेत. शासकीय दर करारानुसार कृषी अधिकाऱ्यानेच ही खरेदी केली. राज्याबाहरेच्या पुरवठादाराने निकृष्ट दर्जाचे पाईप शेतकऱ्यांना दिले आहेत. पुरवठा करण्यापूर्वी दाखविण्यात आलेले सॅम्पल पाईप आणि प्रत्यक्षात पुरवठा करण्यात आलेले पाईप याच्या दर्जात प्रचंड तफावत आहे. याच मुद्दावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी कृषी समितीची बैठक आयोजित केली होती. बैठकीला सर्वच तालुका कृषी अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. मात्र ऐन वेळेवर जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्याने बैठकीला येण्याचे टाळले. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांनी आढावा बैठक घेतली, त्याला सुध्दा कोणतीही पूर्व सूचना न देता कृृषी विकास अधिकाऱ्यांनी दांडी मारली. कृषी विभागातील कारभार अतिशय गोपनीय पध्दतीने सुरू आहे. येथे कोणतीही माहिती तेथील प्रमुखाकडूनच घ्यावी लागते. इतर कर्मचाऱ्यांनी कोणाशीही बोलूच नये असा फतवा काढण्यात आला आहे. याचे नेमके कारण काय याची कल्पना विशेष घटक योजनेतून मिळालेल्या निकृष्ट पाईपावरून दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)