शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव येथील नाफेडची हरभरा खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:23 IST

हरभऱ्याचे पोते उचलण्यासाठी हमाल उपलब्ध नाही, खरेदी केलेला चणा साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नाही, या व अशा अनेक कारणांनी येथील बाजार समितीत नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : हरभऱ्याचे पोते उचलण्यासाठी हमाल उपलब्ध नाही, खरेदी केलेला चणा साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नाही, या व अशा अनेक कारणांनी येथील बाजार समितीत नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. यामुळे मारेगाव तालुक्यातील २०० शेतकºयांची हरभरा विक्री रखडली आहे.मारेगाव येथील बाजार समितीच्या यार्डात ४ एप्रिलला नाफेडतर्फे चणा खरेदीला प्रारंभ केला खरा; परंतु दुसऱ्या दिवशीपासून चणा खरेदी बंद करण्यात आली. नाफेडने खरेदी केलेला माल गोडावूनपर्यंत पोहचविण्यासाठी मारेगाव बाजार समितीत नऊ हमाल आहेत. या हमालांना १० रुपये क्विंटलप्रमाणे मजुरी देण्यात येते. या मजुरीत त्यांना काटा करणे, पोत्यांची शिलाई करणे, भरलेली पोती गोडावूनपर्यंत नेऊन गोडावूनमध्ये त्याची थप्पी मारणे, अशी कामे या हमालांना करावी लागतात. तूर खरेदीमुळे बाजार समितीचे गोडावून फुल्ल झाले आहे. परिणामी चणा साठविण्यासाठी बाजार समितीच्या यार्डापासून काही अंतरावर दुसरे गोडावून आहे. मात्र इतक्या अल्प मजुरीत हमालीचे काम करणे परवडत नसल्याने हमालांनी काम करणे बंद केले आहे. परिणामी तालुक्यातील २०० शेतकऱ्यांना चणा विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नाफेडतर्फे हरभऱ्याला तीन हजार रुपये हमी भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांचा कल नाफेडला हरभरा विकण्याकडे आहे. आता शेतीचा नवा हंगाम तोंडावर आला असू बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. मात्र अद्याप नाफेडचा तिढा न सुटल्याने चणा घरातच साठवून आहे.