शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या सेवानिवृत्त नायब तहसीलदाराला ‘मॅट’चा दिलासा

By admin | Updated: August 21, 2016 01:30 IST

रजा रोखीकरणाचे चार लाख रुपये मिळावे म्हणून सुमारे अडीच वर्ष महसूल प्रशासनाशी संघर्ष करणाऱ्या पुसद येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदाराला

प्रशासनाने अडीच वर्षे फिरविले : मूळ रक्कम मिळाली, व्याजाचेही आदेश पुसद : रजा रोखीकरणाचे चार लाख रुपये मिळावे म्हणून सुमारे अडीच वर्ष महसूल प्रशासनाशी संघर्ष करणाऱ्या पुसद येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदाराला अखेर ‘मॅट’ने दिलासा दिला. ‘मॅट’ची नोटीस मिळताच महसूल प्रशासनाने चार लाखांची रक्कम या याचिकाकर्त्याच्या खात्यात जमा केली. मात्र तेवढ्यावर समाधान न मानता ‘मॅट’ने या अधिकाऱ्याला व्याजाची भरपाईही देण्याचा आदेश महसूल प्रशासनाला जारी केला. रामचंद्र नारायण पंडित (रा.पंचवटी हनुमान मंदिराजवळ, श्रीरामपूर, पुसद) असे या सेवानिवृत्त नायब तहसीलदाराचे नाव आहे. ते धारणीच्या उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात सेवारत होते. तेथेच ते ३० एप्रिल २०१४ ला सेवानिवृत्त झाले. त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ मिळाले. परंतु रजा रोखीकरण आणि प्रवास देयकाचे सुमारे चार लाख रुपये दिले गेले नाही. ही रक्कम मिळावी म्हणून त्यांनी धारणी एसडीओ, अमरावती जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल आयुक्तांपर्यंत दाद मागितली. सुमारे अडीच वर्षे त्यांच्या निवेदने घेऊन महसूल प्रशासनाकडे येरझारा सुरू होत्या. त्यांनी वकीलामार्फत नोटीस दिली. मात्र त्यालाही प्रतिसाद दिला नाही. जिल्हाधिकारी व आयुक्तालयाने तर या नोटीसचे उत्तरही पाठविले नाही. एसडीओ कार्यालयाने ‘संबंधित लिपिक सुटीवर होता’ असे अजब उत्तर पाठविले. न्याय मिळत नसल्याने अखेर पंडित यांनी जीवाचे बरेवाईट करण्याची तंबी दिली. कारण शासनाकडे चार लाख रुपये थकीत असताना त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी उसणे पैसे आणावे लागले होते. परंतु आत्मदहनाच्या तंबीचाही महसूल प्रशासनावर काहीएक परिणाम झाला नाही. अखेर शेवटचा पर्याय म्हणून रामचंद्र पंडित यांनी १७ जून २०१६ रोजी अ‍ॅड. अमोल चाकोतकर (नागपूर) यांच्यामार्फत ‘मॅट’च्या (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. ‘मॅट’ची नोटीस प्राप्त होताच महसूल प्रशासनाने पंडित यांना संपर्क करून ‘मॅट’मधील प्रकरण मागे घेण्याची विनवणी केली. शिवाय त्यांची रजा रोखीकरण व प्रवास देयकांची चार लाखांची रक्कम दुसऱ्याच दिवशी त्यांच्या खात्यात जमा केली. मात्र अर्ज, निवेदनांना प्रतिसाद न देता तब्बल अडीच वर्षे आपल्याच हक्काच्या पैशांसाठी वणवण भटकंती करायला लावणाऱ्या महसूल प्रशासनाला धडा शिकविण्याचा निर्णय रामचंद्र पंडित आणि त्यांचे वकील अ‍ॅड. अमोल चाकोतकर यांनी घेतला. त्यांनी ‘मॅट’मधील याचिका कायम ठेवली. त्यावर ‘मॅट’चे न्यायिक सदस्य एस.एस. हिंगणे यांनी ५ आॅगस्ट रोजी निर्णय देताना पंडित यांना नऊ टक्के व्याजासह चार महिन्यात नुकसान भरपाई व इतर सर्व शिल्लक असलेले लाभ देण्याचे आदेश जारी केले. ‘मॅट’ने महसूल प्रशासनाला दिलेला दणका सेवानिवृत्त नायब तहसीलदार रामचंद्र पंडित यांच्यासाठी दिलासा देणारा ठरला.