शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये वांझ बियाण्यांचे पंचनामे कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील केवळ ५० निकाली काढण्यात आल्या.

ठळक मुद्दे१८० तक्रारी दाखल : पुन्हा पेरणीसाठी शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : उधार-उसणवार करून, दागदागिने गहाण ठेवून, खासगी सावकारांकडून कर्ज घेवून पेरलेले बियाणे वांझ निघाल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले. आता सरकारी खाक्याचा जाच त्यांना सहन करावा लागत आहे. नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील केवळ ५० निकाली काढण्यात आल्या.कापूस घरातच पडून असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी पैसा उभा होऊ शकला नाही. बँकांनी कर्ज उपलब्ध करून देण्याचे सौजन्य दाखविले नाही. मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण पैशांची सोय नसल्याने आडाचेदीड करण्यात आले. कसातरी पैसा उभा होवून बी-बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांनी आणली. मजूर टंचाई, पेरणीच्या साहित्याचा अभाव यातून मार्ग काढत बळीराजाने टोबणी, पेरणी केली. आठ-दहा दिवसांचा कालावधी लोटला, पाऊसही झाला, मात्र बियाणे अंकुरले नाही. याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अखेर झालेही तसेच. शेतात टाकलेले अर्धेअधिक बियाणे उगवले नाही.निकृष्ट बियाणे विक्रेत्यांनी माथी मारल्याच्या निर्णयाप्रत शेतकरी पोहोचले. तक्रार करूनही विक्रेते मानले नाही. ‘आम्ही विक्रेता आहो, उत्पादक नाही’ असा प्रबोधनाचा डोज पाजून शेतकऱ्यांना परत पाठविले. अखेरचा पर्याय म्हणून कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी येतील, पंचनामे करून जातील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतामध्ये नवीन पेरणीच्यादृष्टीने काहीही केले नाही. खूप दिवसांचा कालावधी लोटला जात असतानाही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची पावलं नुकसानग्रस्त काही शेतांकडे वळली नाही.नवीन तक्रारी केव्हा निकाली निघणार ?पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट येते, याचे भान संबंधितांना राहिले नसल्याचे दिसून येते. अजूनही तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. आधीच्या तक्रारींनाच हात लागला नाही, तर नवीन तक्रारी केव्हा निकाली निघणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हाच विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांच्या पुढाकारात किशोर खोब्रागडे, महेश काळे, श्याम काळे आदींनी तक्रारी नोंदविल्या. पंचनामे तात्काळ करण्याची मागणी त्यांनी केली. तालुक्यातील अनेक गावात बियाणे वांझ निघाल्याचे सांगितले जाते.कर्मचाºयांच्या तुटवड्याने अडचणी येत आहेत. शेतात जावून पंचनामे त्वरित व्हावे, हा प्रयत्न आहे. १२२ गावांसाठी केवळ १८ कृषी सहायक आहेत. तरीही अधिकाधिक प्रकरणे निकाली काढली जाईल.- नामदेव कुमरे,तालुका कृषी अधिकारी, नेर

टॅग्स :agricultureशेती