शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी निकषांचे शेतकऱ्यांपुढे जाहीर वाचन

By admin | Updated: July 13, 2017 00:15 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ लागू केली.

जिल्हा बँकेचा पुढाकार : अध्यक्ष अमन गावंडे यांची माहिती, पिंपरीबुटीतून आज शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ लागू केली. या योजनेचा पहिला टप्प्यात निकषांचे जाहीर वाचन करून नंतर पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. याचा प्रारंभ पालकमंत्र्यांचे दत्तक ग्राम असलेल्या पिंप्रीबुटी येथून गुरूवारी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या यादीचे जाहीर वाचन केले जाईल. त्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदारांना आमंत्रित केल्याचे बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांनी सांगितले. पिंप्रीबुटी हे हातगाव ग्रामविविध कार्यकारी सोसायटीच्या अंतर्गत येते. तेथील पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यावर शेतकऱ्यांना आक्षेप नोंदविता येईल. हे अभियान संपूर्ण जिल्हाभर राबविणार असून त्यासाठी आंदोलनावर असलेल्या ग्रामविविध कार्यकारी संस्थेच्या सचिवांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचे निरीक्षक कर्जमाफीसाठी शासनाने जाहीर केलेल्या निकषांचे वाचन करून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार आहे. जिल्हा बँकेचे एक लाख २३ हजार ८८५ सभासद कर्जमाफीसाठी पात्र ठरण्याचा प्राथमिक अंदाज बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सिंगम यांनी वर्तविला. त्यांना ८३९ कोटींचा लाभ मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. नेमकी कर्जमाफी कधी मिळणार, शासन आदेशानुसार तत्काळ दहा हजारांचा लाभ कधी देणार, याचे उत्तर देण्यास मात्र जिल्हा बँक अध्यक्ष व प्रशासन असमर्थ ठरले. केवळ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची यादी तयार करून ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविणार असल्याचे सांगण्यात आले. भविष्यात कर्जमाफीच्या निकषात बदल झाल्यास पुन्हा अशी यादी बनवावी लागू शकते, त्यामुळे या यादीला अंतिम यादी मानता येणार नाही, असेही बँक प्रशासनाने स्पष्ट केले. पत्रपरिषदेला संचालक रवींद्र देशमुख, संजीव जोशी, देवीदास चवरे, सरव्यवस्थापक अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.