शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम; अर्धवट बांधकामे सुस्थितीत आणून बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:07 IST

पावसाळा महिनाभरावर आल्याने राज्यात अर्धवट स्थितीत असलेली रस्ते, पूल व इमारतींची बांधकामे सुस्थितीत आणून बंद करावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी जारी केले.

ठळक मुद्देनव्या कामांना ब्रेककर्जावरील बिगबजेट कामे मात्र सुरूच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा महिनाभरावर आल्याने राज्यात अर्धवट स्थितीत असलेली रस्ते, पूल व इमारतींची बांधकामे सुस्थितीत आणून बंद करावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी जारी केले.मार्च २०१९ पूर्वी जी कामे मंजूर झाली, परंतु अद्याप सुरू झाली नाही ती सुरू केली जाऊ नये. जी कामे प्रगतीत आहेत त्यांना सुस्थितीत आणून ठेवावे व नंतर ती बंद करावी, असे आदेश आहे. परंतु हायब्रीड अ‍ॅन्युईटी, केंद्रीय मार्ग निधी, आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत प्रकल्प, रेल्वे सुरक्षा, नाबार्ड या योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे पुढेही सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. ही कामे कर्जातील निधीतून सुरू असल्याने व्याज वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्याला ग्रीन सिग्नल दिला गेला.राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणात हाती घेतली गेली. मात्र सुरू न झालेली आणि कार्यारंभ आदेश जारी न झालेली कामे सुरू करू नये, ती अर्थसंकल्पातून वगळण्याचे प्रस्ताव सादर करावे, असे निर्देशित करण्यात आले. योजनेत्तर कामांबाबतही हेच आदेश लागू आहेत. कामांचे जॉब क्रमांक रद्द करण्याच्या सूचना आहेत. विशेष दुरुस्ती, पूरहानी, द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. जलनिस्सारण, मोऱ्या, पुलांची कामे यातून वगळण्यात आली आहेत.अत्यावश्यक दुरुस्तीचे काय ?राज्यात अनेक ठिकाणी पूल, इमारत, रस्त्यांची दुरुस्ती अत्यावश्यक आहे. ती न केल्यास अपघात वाढण्याचा, जीवित हानी होण्याचा धोका निर्माण होतो. शिवाय वेळीच दुरुस्ती न झाल्यास भविष्यात त्या कामाचा खर्च वाढतो. अनेकदा दुरुस्तीने व्यवस्थित होणारी ही कामे संपूर्ण नव्यानेच करण्याची वेळ येते. याबाबी लक्षात घेता अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामांना शासनाने परवानगी द्यायला हवी, असा सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांचा सूर आहे.पैशाचे कुणीच काही बोलेना !मार्चच्या अखेरीस शासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याला निधी दिला. परंतु तांत्रिक अडचण निर्माण करून लगेच शेकडो कोटींचा हा निधी ३१ मार्चला परत घेतला गेला. कोरोनामुळे बांधकाम खात्यात निधी नाही, आहे तो परत घेतला गेला, आता पुढे निधी केव्हा मिळणार याचे सूतोवाच कुणीही करण्यास तयार नाही. निधी येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने कुणीही कंत्राटदार काम करण्यास तयार नाही. शासनाने प्रगतीवरील कामे सुस्थितीत आणण्याचे आदेश दिले असले तरी या कामांचे पैसे केव्हा मिळणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे अर्धवट बांधकामे सुस्थितीत आणण्याचे आदेशही कंत्राटदारांकडून थंडबस्त्यात टाकले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग