शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ

By admin | Updated: May 15, 2016 02:03 IST

पांढरकवडा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच विभागांचे कार्यालय आहे. त्यामुळे बाराही महिने येथे नागरिकांची गर्दी असते.

गंभीर समस्या : पांढरकवडा शहरात पाणपोर्इंची संख्या कमीच, पाण्यासाठी वणवण सुरूचपांढरकवडा : पांढरकवडा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच विभागांचे कार्यालय आहे. त्यामुळे बाराही महिने येथे नागरिकांची गर्दी असते. मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसातही शहरातील सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने सर्वत्र पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे.येथील बसस्थानक, शासकीय कार्यालये, विविध बँकेच्या शाखा, आदी ठिकाणी दररोज नागरिकांची प्रचंड गर्दी असते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसातही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची थातुरमातूर व्यवस्था केलेली दिसते. मात्र तेथे घाणीमुळे पाणी कुणीच प्राशन करू शकत नाही. पाण्याचा वापर केवळ हात-पाय धुण्यासाठी केला जात आहे. सध्या बसस्थानकात थंड पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. शहरात काही ठिकाणी केवळ एक-दोन माठ ठेवून काही सामाजिक कार्यकर्ते व संघटना आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे समाधान मानत आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागातही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पंचायत समिती कार्यालयात मात्र बाराही महिने मुबलक व थंड पाणी उपलब्ध असते. तसेच दरवर्षी केळापूर येथील जगदंबा संस्थानतर्फे पाणपोईची व्यवस्था केली जाते. त्यासाठी येथील नगरपरिषद पाणी पुरवठा करीत आहे. हे एकमात्र उदाहरण सोडले, तर शहरात कुठेही पाणपोईची सुरूवात झालेली नसल्याचे दिसते. शहरात तहसील, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, न्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये आहे. तेथे तालुक्यातील नागरिक आपापल्या कामानिमित्त दररोज येत असतात. मात्र त्यांची तहान भागविण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे दुरापास्त झाले आहे. अधिकारी व सामाजिक संस्थांमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात काही परिसरात पाणपोई सुरू करण्याची योजना अद्याप कार्यान्वित होऊ शकलेली नाही. बसस्थानकात पेयजलसाठी जलकुंभही उभारण्यात आलेले नाही. दरवर्षी प्रवाशांना टाकीमधूनच नळाद्वारे येणारे गरम पाणीच प्राशन करावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)मे चा उत्तरार्ध आणि जूनमध्ये होणार भयावह अवस्थागेले १५ दिवस सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला नाही. मात्र आता मे महिन्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे तसेच जूनमध्येही पाणी प्रश्न निर्माण गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी दाहीदिशा पालथ्या घालाव्या लागण्याची शक्यता आहे. बाटली बंद पाणी त्यांना आधार देईल. मात्र सामान्य नागरिकांना बाटली बंद पाणी घेणे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांची फरफट होण्याची शक्यता बळावली आहे.