शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकामे अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:02 IST

लॉकडाऊनमुळे महामार्गच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातील रस्ते, पूल, इमारतींची कामे अर्धवट आहेत. आत्ताच शासनाने ही कामे सुस्थितीत आणण्याचे नियोजन न केल्यास पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात गावांचा संपर्क तुटणार, शासनाचे अद्यापही नियोजन नाही

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे महामार्गच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातील रस्ते, पूल, इमारतींची कामे अर्धवट आहेत. आत्ताच शासनाने ही कामे सुस्थितीत आणण्याचे नियोजन न केल्यास पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होणार आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन असल्याने दोन महिन्यांपासून सर्वकाही ठप्प आहे. सार्वजनिक बांधकामे जानेवारी ते जून या काळात केली जातात. परंतु यावर्षी फेब्रुवारीपासूनच कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने शासनाचे या कामांकडे दुर्लक्ष झाले. लॉकडाऊनमुळे ही कामे अर्धवट स्थितीत आहेत. नवा पूल बांधायचा म्हणून जुना पूल तोडला गेला, बांधकामासाठी रस्ता उखडून ठेवण्यात आला, अनेक इमारतींची कामे अर्धवट आहेत. पावसाळा महिनाभरावर आला तरीही अर्धवट बांधकामे पूर्ण करण्याबाबत किंवा किमान सुस्थितीत आणून ठेवण्याबाबत शासनाचे कोणतेही नियोजन नाही. ही कामे आहे त्याच अवस्थेत राहिल्यास ग्रामीण जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागेल, त्यात पावसाळ्यात जीवित हानी होण्याची, गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

शासनाने शेकडो कोटी परत घेतले२५ मार्चला शासनाने बांधकाम खात्याला निधी दिला. परंतु बीडीएस प्रणाली बंद करून शासनाने ३१ मार्चला शेकडो कोटी रुपये बांधकाम खात्याकडून परत घेतले. शिवाय भविष्यात निधी केव्हा उपलब्ध होणार याबाबतचे कोणतेही सूतोवाच करण्यात आलेले नाही. त्यामुळे कामे सुरू करण्यास कंत्राटदार तयार नाहीत.कंत्राटदारांची शेकडो कोटींची देयके थकीतआधीच कंत्राटदारांची शेकडो कोटींची देयके थकीत आहे. शासनाचा पैसा घेऊनही ही देयके मिळालेली नाहीत. निधी केव्हा उपलब्ध होणार याबाबत शासनाने आठवडाभरात स्पष्ट धोरण जाहीर करणे अपेक्षित आहे. एकूणच सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंते व कंत्राटदारांमध्येसुद्धा संभ्रमाची स्थिती आहे.

पावसाळ्यात डांबर-काँक्रीटीकरण अशक्यशासनाने जूनच्या तोंडावर निधी दिल्यास पावसाळ्यात डांबरीकरण, काँक्रीटीकरण किंवा अन्य बांधकामे करणे अशक्य आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला या अपूर्ण बांधकामांचा त्रास सहन करावा लागेल. शासन प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अभियंत्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे ग्रामीण समस्या कायम राहतात, असा सूर बांधकाम खात्यातून ऐकायला मिळतो.‘पीएमजीएसवाय’ला निधीचे ग्रहणप्रत्येक जिल्ह्यात ‘पीएमजीएसवाय’ची २५ ते ३० कोटींची देयके प्रलंबित आहेत. शासनाने समृद्धी महामार्ग, हायब्रीड अ‍ॅन्युईटी, केंद्रीय रस्ते निधी ही कामे तूर्त बाजूला ठेवून आधी ग्रामीण बांधकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार