शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकाविरुद्ध दिग्रसमध्ये जनक्षोभ

By admin | Updated: August 21, 2016 01:31 IST

पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध दिग्रसमध्ये जनक्षोभ उफाळला आहे.

पोलीस ठाण्यावर मोर्चा : कठोर कारवाई करण्याचे प्रभारी एसडीपीओ गौतम यांचे आश्वासनदिग्रस : पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध दिग्रसमध्ये जनक्षोभ उफाळला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी विद्यार्थी आणि विविध पक्षांतर्फे शहरात मोर्चा काढण्यात आला.येथील सरुबाई पाटील शाळेच्या पाचव्या वर्गाचा वर्गशिक्षक नीलेश बदुकले याने आपल्या खासगी शिकवणीवर्गात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या घटनेने शहरात चांगलेच तणावाचे वातावरण पसरले. घटनेच्या काही तासातच बदुकलेला पोलिसांनी अटक केली. तर त्या पीडित मुलावर अनैसर्गिक कृत्य झाल्याच्या बाबीला वैद्यकीय अधिकारी वीरेंद्र अस्वार यांनी पुष्टी दिली आहे. या घटनेनंतर शनिवारी २० आॅगस्टला महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा सकाळी दहा वाजता येथील शिवाजी चौकातून निघाला. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या अनिलसिंह गौतम, तहसीलदार किशोर बागडे, ठाणेदार शिवाजी बचाटे यांना कडक कारवाई करावी याबाबत निवेदन दिले. दरम्यान येथील प्रत्येक शिकवणीवर्गात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आरोपी नीलेश बदुकलेवर कठोर कारवाई होईल. तो कारवाईतून निसटेल अशी कोणतीही चूक पोलिसांकडून होणार नाही, याबाबत प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिलसिंह गौतम यांनी ग्वाही दिली. दरम्यान सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संस्था चालकांनी घेतला. यावेळी सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या घटनेने पालकात काळजी निर्माण झाली. (प्रतिनिधी)