शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत विद्यार्थिनींची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:45 IST

शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर दामिनी पथकाने येथील विद्यार्थिनींमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला. विद्यार्थिनींना यात सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देअत्याचार प्रकरणानंतर जाग : दामिनी पथकाने केले मार्गदर्शन, वकिलांचीही उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर दामिनी पथकाने येथील विद्यार्थिनींमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला. विद्यार्थिनींना यात सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.शहरात नुकताच एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा उलगडा झाला. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटकही केली. याप्रकरणी शहरवासीयांनी निषेध मोर्चाही काढला होता. त्यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकाने रविवारी येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनी व पालकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ठाणेदार यशवंत बावीस्कर यांनी पालकांना आपल्या पाल्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच संस्कृती देण्याचे आवाहन केले. यवतमाळ येथील महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या दामिनी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे यांनी मुलींनी आपल्यासोबत कुठलीही वाईट घटना घडल्यास तत्काळ पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. शासन महिला अत्याचाराबाबत अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.एखादा तरुण मुलींवर वाईट नजर ठेऊन असल्यास मुलींनी तत्काळ दामिनी कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मुलींनी मोबाईलचा वापर कामापुरताच करावा, असे आवाहन अ‍ॅड. अरुणा राठोड यांनी केले. मुलींनी पालकांसह आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, आपल्या वागण्याकडे लक्ष द्यावे असेही सांगितले. मुलींनी स्वत:च्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजे, असे अ‍ॅड. राठोड यांनी स्पष्ट केले.यावेळी दिनेश जाधव, महिला पोलीस कर्मचारी अश्विनी कंडारे, विकी राऊत, गृहपाल वर्षा लाकडे, राणी ठाकरे, विद्या देवतळे, सोनाली गरडे आदी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनींच्या विविध शंकांचे पाहुण्यांनी निरसन केले.विद्यालयासमोर दुचाकी तपासणीआर्णीतील वातावरण अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त असल्याने पोलिसही जागे झाले आहे. सोमवारी येथील म.द. विद्यालयासमोर आणि शिवनेरी चौकात दुचाकींची तपासणी करण्यात आली. आवश्यक कागदपत्र नसलेल्या २० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. अमित झेंडेकर, मनोज चव्हाण यांनी ही कारवाई पार पाडली.