शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:41 IST

महागाव : जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यात दारव्हा मतदारसंघातील दिग्रस व दारव्हा तालुक्यातील आठ हजार ...

महागाव : जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यात दारव्हा मतदारसंघातील दिग्रस व दारव्हा तालुक्यातील आठ हजार ४०० शेतकऱ्यांना पात्र ठरवून लाभ देण्यात आला. मात्र, उर्वरित शेतकरी अद्याप वंचित आहे. त्यांना तत्काळ लाभ् द्यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दारव्हा विधानसभा मतदारसंघ वगळता इतर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. वंचित शेतकर्‍यांना त्वरित पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, अन्यथा विदर्भ जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत विमा कंपन्यांची तत्काळ बैठक बोलावणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे वंचित साडेचार लाख शेतकऱ्यांना विमा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. गतवर्षी शासनाने आवाहन केल्यानुसार, साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातून विमा कंपन्यांनी कोट्यवधींची माया गोळा केली. त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील विशिष्ट तालुक्याला विमा कंपन्यांनी लाभ दिला. हा इतर शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असे समितीने म्हटले आहे. समितीने विमा कंपन्यांविरुद्ध तत्काळ कार्यवाही करण्याचे निवेदन दिले, अन्यथा ही बाब न्यायालयात नेण्याचा इशारा दिला.