शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

जिल्हा परिषदेत प्रोटोकॉलची वाट

By admin | Updated: July 24, 2015 02:05 IST

जिल्हा परिषद ही मिनीमंत्रालय म्हणून ओळखली जाते. या मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक अपेक्षित आहे.

वर्चस्वच नाही : पदाधिकारीच फिरतात फाईली घेऊन अधिकाऱ्यांमागे यवतमाळ : जिल्हा परिषद ही मिनीमंत्रालय म्हणून ओळखली जाते. या मंत्रालयातील पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात येथे पदाधिकारीच आपल्या कामांच्या फाईली घेऊन अधिकाऱ्यांच्या कक्षात येरझारा मारत असल्याचा धक्कादायक प्रकार आहे. जिल्हा परिषदेतील या प्रोटोकॉलच्या ऐसीतैसीची राजकीय गोटात चर्चा आहे. जिल्हा परिषदेमध्ये प्रमुख सहा पदाधिकारी आहेत. त्यातील तीन महिला आहेत. या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही कामासाठी सीईओ वगळता इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कक्षात बोलविणे क्रमप्राप्त आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्हा परिषदेत अनेक ठिकाणी उलटी गंगा वाहत असल्याचे चित्र आहे. आपल्या सोईची कामे काढून घेण्यासाठी पदाधिकारी स्वत: फाईल घेऊन अधिकाऱ्यांच्या कक्षात वारंवार जात असल्याचे व त्यांच्या मागे फिरत असल्याचे सांगण्यात येते. काही प्रकरणात तर ‘नवरोजी’चाच हस्तक्षेप अधिक असल्याचे पहायला मिळते. वास्तविक सदस्यांची कामे पदाधिकाऱ्यांच्या कक्षात होणे अपेक्षित आहे. परंतु खुद्द पदाधिकारीच अधिकाऱ्यांच्या कक्षात फाईली घेऊन जात असल्याने त्यांच्या पक्षाच्या सदस्यांवरही अधिकाऱ्यांकडे क्षुल्लक कामांसाठी येरझारा मारण्याची वेळ येते. खुद्द पदाधिकाऱ्यांना प्रोटोकॉल समजत नसल्याने अधिकारीही त्यांना तेवढे गांभीर्याने घेत नाही. एखाद-दोन पदाधिकारी मात्र त्याला अपवाद आहे. मुळात जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर अंकुश नाही. प्रशासकीय कामाचा अनुभव नसणे, तांत्रिक ज्ञान नसणे, अभ्यास नसणे, कायदे-नियम न समजणे आदी बाबी त्यासाठी कारणीभूत मानल्या जातात. (जिल्हा प्रतिनिधी) २८ जुलैला विशेष सर्वसाधारण सभा दुष्काळ व शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी २८ जुलै रोजी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. या सभेचे श्रेय कुणाचे यावरुन काँग्रेस व राष्ट्रवादीत वाद सुरु आहे. काँग्रेसने नोटीस दिल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीने वेगाने चक्रे फिरवून पत्रपरिषदेद्वारे हे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसच्या गोटातून होऊ लागला आहे. जिल्हा परिषदेमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना पुरेसे ज्ञान नसल्याचा गैरफायदा अधिकाऱ्यांकडून उठविला जात आहे. बहुतांश फाईली पदाधिकाऱ्यांकडे न पाठविता परस्परच प्रशासनाच्या स्वाक्षरीसाठी जात आहेत. शासकीय अनुदानावरील विविध साहित्य अधिकाऱ्यांनी परस्परच पंचायत समिती स्तरावर रवाना केले. त्याचे लाभार्थ्यांना वाटपही सुरू झाले. मात्र त्याबाबत पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवले गेले. यावरून नेमकी कुणाची पकड किती हे दिसते?.जिल्हा परिषदेतील काही पदाधिकारी आपल्या पक्षाच्या नेत्यांना ‘सरेन्डर’ झाले की काय अशी शंका त्यांच्या कामकाजाच्या पद्धतींवरून यायला लागली आहे. त्यांचा विभाग नेतेच बांधून चालवित असल्याचे चित्र अनेकदा पहायला मिळते. जिल्हा परिषदेत चांगले शिक्षण, उत्तम आरोग्य व उजळ प्रतिमा असलेले हुशार पदाधिकारीही आहेत. मात्र त्यांच्यात आक्रमकता नाही. त्यांच्या शांत स्वभावाचा अधिकाऱ्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे. त्यांची दिशाभूल केली जाते. सध्या जिल्ह्यात कलेक्टरचा बोलबाला आहे. जवळपास त्यांच्या एवढेच अधिकार जिल्हा परिषदेत सीईओंना आहे. मात्र तेथे प्रशासनाचा रिझल्ट दिसत नसल्याचा राजकीय सूर ऐकायला मिळत आहे. सीईओंनी चाबूक हातात घेतल्यास जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला वठणीवर आणायला वेळ लागणार नाही, असा विश्वास प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र सध्या त्यांच्या अधिनस्त यंत्रणेतील अनेक जण मुजोर, कामचुकार व बेजाबदार झाल्याचे दिसते. कर्मचारी संघटना पदाधिकारी व प्रशासनावर हावी झाल्याचे विदारक चित्र पहायला मिळते. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली तरी त्यांच्यात श्रेय लाटण्यावरून धुसफूस ऐकायला मिळते. राष्ट्रवादीच्या सदस्यांचा रिमोट नेत्यांकडे असला तरी काँग्रेस सदस्यांबाबत ही स्थिती नाही. काँग्रेसच्या नेत्यांचे झेडपीवर लक्षच नसल्याचे गोंधळलेल्या कारभारावरून दिसते.