शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

सज्जनांचे रक्षण करा दुर्जनांना धडा शिकवा

By admin | Updated: September 4, 2015 02:24 IST

आगामी सण-उत्सव काळात पोलिसांनी नागरिकांच्या सोबत राहावे, सौजन्याने वागावे, सज्जनांचे रक्षण करून दुर्जनांना धडा शिकवावा, ...

महानिरीक्षक : जिल्हा पोलिसांना आवाहन यवतमाळ : आगामी सण-उत्सव काळात पोलिसांनी नागरिकांच्या सोबत राहावे, सौजन्याने वागावे, सज्जनांचे रक्षण करून दुर्जनांना धडा शिकवावा, असे भावनिक आवाहन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी गुरुवारी येथे पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.अमरावती येथे रुजू झाल्यानंतर यवतमाळला त्यांची ही पहिलीच भेट होती. आगामी पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षक सिंघल यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सिंघल म्हणाले, ‘सदरक्षणाय-खलनिग्रहणाय’ हे पोलीस खात्याचे ब्रीद आहे. त्यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेसोबत व्यवहार ठेवला पाहिजे. पोलिसांप्रती जनतेत आपुलकी निर्माण करायची असेल तर पोलिसांनी आपली वागणूक सौजन्याची ठेवली पाहिजे. सज्जनांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून दुर्जनांना त्यांची जागा दाखविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव काळात पोलीस बंदोबस्त कसा राहील, किती मनुष्यबळाची आवश्यकता भासेल, संवेदनशील ठिकाणे किती, त्यांचा इतिहास याचा आढावा घेताना, वारंवार कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या विघातक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी करण्याचे आदेशही सिंघल यांनी दिले. अवैध धंद्यांना थारा देऊ नका, अशा व्यावसायिकांपासून चार हात दूर राहा, जनतेत संपर्क वाढवा, असा सल्लाही पोलीस महानिरीक्षकांनी जिल्हाभरातील ठाणेदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर अधीक्षक काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)