शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

८४ लाखांच्या होमिओपॅथी औषधी खरेदीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २१ लाख नागरिकांना ही औषधी दिली जाणार आहे. त्याचे दोन टप्पे आहेत. जिल्हा परिषदेने सुमारे ८४ लाखांचे बजेट असलेली ही होमिओपॅथी औषधी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. पंचायत विभागाने ह्यआयुषह्णचे तांत्रिक मार्गदर्शन घेऊन त्याच्या निविदाही काढल्या. परंतु औषधी नेमकी कोणत्या फॉर्मेटमध्ये (लिक्वीड, टॅबलेट, कॅप्सुल आदी) द्यायची हे स्पष्ट नसल्याने तीन दिवसांपूर्वी अखेर शासनाला या संबंधी मार्गदर्शन मागण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : शासनाला मार्गदर्शन मागितले, व्याजाच्या पैशातून तरतूद, राजकीयच इन्टरेस्ट अधिक, दबावासाठी अधिकाऱ्याच्या जुन्या कामगिरीवर जोर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात काहीशी कमी होत आहे, त्याचवेळी हिवाळ्यात ही संख्या आणखी वाढण्याचा धोका आरोग्य मंत्रालयाने वर्तविला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने तब्बल ८४ लाख रुपये खर्च करून आरसेलिक अल्बम ही होमिओपॅथी औषधी खरेदीची तयारी चालविली आहे. यासाठी राजकीय स्तरावरून अधिक सूत्रे हलविली जात आहे.जिल्ह्यात २१ लाख नागरिकांना ही औषधी दिली जाणार आहे. त्याचे दोन टप्पे आहेत. जिल्हा परिषदेने सुमारे ८४ लाखांचे बजेट असलेली ही होमिओपॅथी औषधी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. पंचायत विभागाने ह्यआयुषह्णचे तांत्रिक मार्गदर्शन घेऊन त्याच्या निविदाही काढल्या. परंतु औषधी नेमकी कोणत्या फॉर्मेटमध्ये (लिक्वीड, टॅबलेट, कॅप्सुल आदी) द्यायची हे स्पष्ट नसल्याने तीन दिवसांपूर्वी अखेर शासनाला या संबंधी मार्गदर्शन मागण्यात आले आहे. निविदा अद्याप उघडल्या गेलेल्या नाहीत. जिल्हा परिषदेला शासनाकडून व्याजापोटी रक्कम मिळते. ही रक्कम शासनाने कोरोनामुळे जिल्हा परिषदेकडून परत घेतली. याच रकमेतून शासन ८४ लाखांचा निधी दोन टप्प्यात उपलब्ध करून देणार आहे. प्रस्तावावर शासन काय निर्णय घेते याकडे नजरा लागल्या आहेत.मर्जीतील डॉक्टर मार्फत पुरवठ्याचा डाव८४ लाखांच्या या औषधी खरेदीमागे राजकीय ह्यइन्टरेस्टह्ण असल्याचे सांगितले जाते. सूत्रानुसार, राजकीय नातेसंबंध असलेल्या एका निकटवर्तीय डॉक्टरच्या कुटुंबातया पॅथीचे डॉक्टर आहे. त्यांच्याच माध्यमातून सुमारे ८४ लाखांची ही होमिओपॅथी औषधी जिल्हाभर पुरविण्याचा डाव आहे. निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असली तरी त्यातूनही या कंत्राटासाठी मध्यम मार्ग काढण्यासाठी चाचपणी सुरू आहे. १२ रुपयामध्ये उपलब्ध होणारी इम्युनिटी वाढविणारी औषधाची ही छोटी बॉटल कोरोना काळात सर्रास १०० रुपयात विकली गेली. यावरून या औषध खरेदीत राजकीय ह्यमार्जीनह्ण किती असेल याचा अंदाज येतो. कोरोना काळात बहुतांश सामाजिक संस्थांनी या औषधाचे मोफत वितरण केले. तरीही जिल्हा परिषदेला त्यावर ८४ लाख रुपये खर्चाची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मंजुरीचा आग्रह, राजकीय दबावठरल्याप्रमाणे ८४ लाखांच्या औषधी खरेदीचे फाईल तयार केले गेले. ते मंजुरीसाठी पाठविले गेले. परंतु एवढा मोठा आकडा पाहून मंजुरीविना ते परत पाठविण्यात आले. त्यानंतर मंजुरी का दिली नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेच्या प्रमुख कक्षात बोलविण्यात आले. तेथे पुन्हा युक्तीवाद केला गेला. मात्र अधिकारी काही एक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर तुमची ह्यजुनी कामगिरी आम्हाला माहीत आहेह्ण असे म्हणून या अधिकाऱ्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर चारच दिवसात या फाईलचा प्रवास सुकर झाल्याचे सांगितले जाते. आता शासनाकडे मागितलेले मार्गदर्शन ही त्यातील तूर्त पळवाट तर नव्हे ना अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक विभागातील असे ह्यकारनामेह्ण पुढे येत आहेत.१४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या निधीतून ही औषधी खरेदी केली जाणार होती. निविदा प्रक्रियाही राबविली. मात्र निधीअभावी ही प्रक्रिया थांबली आहे.- डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ. 

टॅग्स :medicinesऔषधं