शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता लाखोंची, कुलूप शंभराचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्यांचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. लाखो रुपये किमतीचे घर चोरटे क्षणात फोडतात. याकरिता चोरट्यांकडून विविध तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांपुढे घराला लावलेले कुलूप टिकत नाही. कुलूप कितीही मोठे असले तरी चोरट्यांना ते सहज तोडता येते. इतकेच नव्हे, तर घराला असलेले हँडल आणि कडी चोरटे सहज तोडतात. याकरिता वापरल्या जाणारे साहित्य घरमालक अतिशय स्वस्त दरातले खरेदी करत असल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देकुलूप खरेदी करताना काटकसर : चोऱ्या करणाऱ्यांची चैनी; स्वस्त कुलूपांना मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घर बांधताना प्रत्येक गोष्ट निरखून खरेदी केली जाते. कुठलीही काटकसर नको. शिवाय, घर मजबूत आणि सुरक्षित असावे म्हणून घरमालक वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात. असे असले तरी या घराला सुरक्षा प्रदान करणारे कुलूप मात्र स्वस्त दरातील खरेदी करण्यात येते. यामुळे चोरट्यांचे फावले आहे. जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्यांचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. लाखो रुपये किमतीचे घर चोरटे क्षणात फोडतात. याकरिता चोरट्यांकडून विविध तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांपुढे घराला लावलेले कुलूप टिकत नाही. कुलूप कितीही मोठे असले तरी चोरट्यांना ते सहज तोडता येते. इतकेच नव्हे, तर घराला असलेले हँडल आणि कडी चोरटे सहज तोडतात. याकरिता वापरल्या जाणारे साहित्य घरमालक अतिशय स्वस्त दरातले खरेदी करत असल्याचे पुढे आले आहे. घराकरिता लाखो रुपये मोजणारी मंडळी कुलूप खरेदी करताना स्वस्तातील कुलूप कोणते आहे, याचाच शोध घेतात. यामुळे चोरट्यांना कुलूप तोडताना फारसा वेळ लागत नाही. यवतमाळातील कुलूप विक्रेत्यांच्या काही दुकानांत यासंदर्भातील माहिती घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बाजारपेठेत साधे कुलूप सर्वाधिक लोकप्रिय आहे. या कुलपाची किंमत २० रुपयांपासून ते १३०० रुपयांपर्यंत आहे. सर्वसाधारण ग्राहक ५० ते ७० रुपये किमतीचे कुलूप खरेदी करतात. महागड्या कुलपाकडे घरमालक चुकूनही पाहत नाहीत. मोर्टिस लाॅक आणि राऊंड पॅडलाॅक याकडे खरेदी करणारे ग्राहक फारसे नसतातच. या कुलपांच्या किमती ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे विक्रेतेही असे कुलूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवत नाहीत. यामुळे लाखो रुपये किमतीचे घर तकलादू कुलपांमुळे असुरक्षित झाले आहे. ग्राहक कुलूप आणि दार याबाबत अनभिज्ञ असल्याचेच पुढे आले आहे. जिल्ह्यात वर्षभरात १४० घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोड्यांत चोरट्यांनी सब्बल आणि इतर तांत्रिक साहित्यांचा वापर केला आहे. बहुतांश घरांना साधे कुलूप आणि स्वस्त कुलूप पाहायला मिळाले. यामुळे नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे.

वर्षभरात झाल्या १४० घरफोड्याजिल्हाभरात घरफोड्यांचे सत्र वारंवार घडत आहे. जिल्ह्यात वर्षभरात १४० घरफोड्यांची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे. प्रत्येक तालुक्यात चोरट्यांनी घरांना लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे, अधिक तगडे घर चोरट्यांनी निशाण्यावर धरले आहे. यातील बहुतांश घरांना स्वस्त दरातले कुलूप लागले होते. चोरट्यांना हे कुलूप सहजरित्या फोडता आले आहे. यामुळे पुढील काळात नागरिकांनी सावध होऊन घराची सुरक्षा करणारे कुलूप लावण्याची नितांत गरज आहे.

टॅग्स :Thiefचोर