कळंब : महाराष्ट्र तलाठी- मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने पुकारलेल्या आंदोलनांतर्गत तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यासंदर्भातील निवेदन विदर्भ पटवारी संघ शाखा राळेगावचे सहसचिव निरंजन सातघरे यांच्या पुढाकारात तहसीलदारांना देण्यात आले आहे. साज्याची पुनर्रचना करावी, आॅनलाईन सातबारातील त्रृटी दूर कराव्या, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांसाठी कार्यालय बांधून द्यावे, अवैध गौण खनीज वसुलीच्या कामातून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना वगळावे, महसूल विभागात पदोन्नतीसाठी व्दिस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांमधून भरावी अंशदायी निवृत्ती वेतन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या व इतर मागण्यांसाठी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे. निवेदन देताना तलाठी विजय मेश्राम, राजेश चौधरी, प्रशांत उरकुडे, अनिल सुरपाम, निरंजन सातघरे, अनिल घोडे, स्मिता पांडे, किशोर शेंडे, प्रमोद चचाने, राहुल निशाणे, प्रशांत घडिकर, प्रिया नलगे, भाग्यश्री धनकुलवार, नंदा धवने, संध्या वाघमारे, रश्मी भेंडे, वैशाली करपते, रूपाली मानेकर, पल्लवी वटे, भूमिका विधळे, कालिदास डंभारे, तलवारे, तिरळे, ठाकरे, मंडळ अधिकारी संवर्गातील संजय रोहणकर, नितीन खरोडे, रवींद्र शिंदे, विनोद पंचबुद्धे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
कळंब येथे तलाठ्यांचा संप
By admin | Updated: April 29, 2016 02:37 IST