शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अपंगांसाठीच्या योजना योग्यरीत्या राबवा

By admin | Updated: May 9, 2016 02:35 IST

अपंग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी अनेक कायदे अस्तित्वात आले आहेत. या कायद्यानुसार अपंगांना रोजगारक्षम बनविण्यासाठी...

सचिंद्रप्रताप सिंह : अपंग व्यक्ती अधिनियम अंमलबजावणीचा आढावा यवतमाळ : अपंग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी अनेक कायदे अस्तित्वात आले आहेत. या कायद्यानुसार अपंगांना रोजगारक्षम बनविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या उत्पन्नाच्या तीन टक्के रक्कम खर्च करणे आवश्यक आहे. अपंगांच्या योजना योग्यरित्या राबवा असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.महसूल भवन येथे अपंग व्यक्ती अधिनियम अंमलबजावणी संदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला समाजकल्याण अधिकारी जया राऊत, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.बांगळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तथा अशासकीय सदस्य उपस्थित होते.अपंगांच्या विकासासाठी ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषदांना आपल्या उत्पनाच्या ३ टक्के रक्कम खर्च करणे बंधणकारक आहे. त्याप्रमाणे या संस्थांनी खर्च करून त्याचा अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. हा निधी खर्च करतांना त्यांना रोजगार उपलब्ध होईल किंवा त्यांच्या हातात बऱ्यापैकी पैसा पडेल अशाच बाबींवर तो खर्च केला जावा. यवतमाळ नगर परिषदेकडे तीन टक्के अंतर्गत २७ लक्ष रुपए उपलब्ध असून यातून झेरॉक्स मशिन, आटा चक्की, बिज भांडवल सारख्या योजना राबविण्यात येणार असल्याचे समाजकल्याण अधिकारी जया राऊत यांनी सांगितले.ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा जिल्हा परिषदांकडे उपलब्ध असलेल्या दुकान गाळ्यांची माहिती घेऊन त्यातील काही गाळे अपंग किंवा महिला बचतगटांना व्यवसायासाठी उपलब्ध करून देता येईल का, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. अपंगांना रोजगारक्षम प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास ते व्यवसाय करू शकतात. त्यामुळे अपंगांना नेमके कोणते प्रशिक्षण हवे आहे, त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे प्रशिक्षण योजना सुरू केली जावी, असेही ते म्हणाले.तर दफ्तर दिरंगाई कायद्यान्वये कार्यवाहीनगरपालिकांनी आपल्या उत्पन्नाच्या तीन टक्के रक्कम अपंगांसाठी खर्च करून तसा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषदा या खर्चाबाबत अहवाल सादर करीत नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. अशा नगरपरिषदांना लेखी पत्र देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. ज्या नगरपरिषदा वारंवार पत्रव्यवहार करूनही माहिती देत नसेल तर संबंधितांवर दफ्तर दिरंगाई कायद्यान्वये कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी)अनुदानाची रक्कम थेट अपंगांच्या खात्याततीन टक्के निधीतून अपंगांसाठी रोजगारक्षम योजना राबविताना जिल्हा किंवा नगर परिषद स्तरावर खरेदी करून त्याचे वितरण अपंगांना केले जाते. शासनाच्या नवीन निर्देशाप्रमाणे अपंग बांधवांना आता स्वत: रोजगारक्षम साहित्य खरेदी करावयाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या निधीतून आता खरेदी करू नये, अपंगांनी केलेल्या साहित्या खरेदी प्रमाणे त्यांच्या खात्यात अनुदान उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. अपंगांनीही साहित्य खरेदी करून अनुदानाची मागणी करावी. या पध्दतीमुळे अपंगांना आपल्या इच्छेने खरेदी करता येईल तसेच जिल्हा किंवा तालुका पातळीवर खरेदीसाठी होणाऱ्या भानगडींवर चाप बसेल असे जिल्हाधिकारी म्हणाले.