शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘मेडिकल’च्या आठ अधिव्याख्यात्यांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2015 02:35 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ अधिव्याख्यातांची सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली आहे.

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ अधिव्याख्यातांची सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर या अधिव्याख्यात्यांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ.किशोर इंगोले यांना पदोन्नतीसाठी सातारा येथे जावे लागले.गेल्या अनेक वर्षांपासून अधिव्याख्याता म्हणून काम करणाऱ्या या डॉक्टरांकडून पदोन्नतीसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचनालयाकडे पाठपुरावा सुरू होता. सरकार बदलल्याने पदोन्नती प्रक्रियेबाबत आशा निर्माण झाल्या आहे. डॉ.किशोर इंगोले यांना सातारा येथे तर न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ.शरद कुचवार यांची अकोला येथे पदोन्नतीवर बदली झाली. नाक, कान, घसा विभागाचे डॉ.प्रशांत केचे, बधिरीकरणशास्त्र विभागातील डॉ.धरम पवार, बालरोगशास्त्र विभागाचे डॉ.रवी चव्हाण, दंत चिकित्सा विभागाचे डॉ.आशा काळबांडे, विकृतीशास्त्र विभागाचे डॉ.नीलिमा सुराणा, डॉ.खांडेकर यांची महाविद्यालयातच पदोन्नतीवर सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बऱ्याच वर्षानंतर शासनस्तरावर दखल घेतल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील या वैद्यकीय महाविद्यालयाला पूर्ण पदभरतीचा बुस्ट देणे गरजेचे आहे. तरच येथील रुग्णसेवा आणखी सुसज्ज करता येणार आहे. या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा शासनाकडून लागल्या आहे. (कार्यालय प्रतिनिधी)