शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागात पदोन्नतीचा घोडेबाजार

By admin | Updated: September 1, 2014 00:15 IST

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात आरोग्य सेवक आणि आरोग्य सहायक संवर्गातील ४० कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागात लाखांवर बोली लावली जात

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात आरोग्य सेवक आणि आरोग्य सहायक संवर्गातील ४० कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागात लाखांवर बोली लावली जात असल्याचा प्रकार निनावी तक्रारीमुळे पुढे आला आहे. सोयीच्या गावातच पदोन्नती मिळावी यासाठी हा घोडेबाजार सुरू आहे. शासकीय नोकरीत असलेल्यांना आपल्या गावाचा मोह सोडवत नाही. नोकरीत गलेलठ्ठ पगार हवा मात्र कामही घरीबसून करता आले पाहिजे अशीच अनेकांची अपेक्षा आहे. हिच मानसिकता हेरून आरोग्य विभागातील पदोन्नती प्रक्रियेत लाखोंचा घोडेबाजार सुरू आहे. यवतमाळ तालुक्यातील आरोग्य केंद्रात पदोन्नती मिळावी यासाठी लाखोंची बोली लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ज्यांनी सोईचे ठिकाण मिळाले नाही, म्हणून पदोन्नती नाकरली होती. तेच कर्मचारी बोली लावण्यात पुढे आहे. जिल्हा परिषदेतील तीन पदाधिकाऱ्यांनी तर आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या नावाची शिफारस केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ही तक्रार जिल्हा परिषदेकडून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. यामध्ये बाभुळगाव तालुका, नेर तालुका आणि राळेगाव तालुक्यातील आरोग्य केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्याला कोणती गावे मिळणार याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. शिवाय शिफारस करणारे दोन पदाधिकारी आणि सदस्याचेही नाव दिले आहे. या निनावी तक्रारीमुळेच नव्हे तर सावरगाव, डोंगरखर्डा, बेलोरा आणि सावरगड आरोग्य केंद्र मिळविण्यासाठी चांगलीच रस्सीखेच आहे. विशेष म्हणजे यात ज्यांनी यापूर्वी पदोन्नती नाकारली अशा कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेक कर्मचारी पदोन्नतीसोबतच सोईचे गाव मिळविण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असल्याचेही दिसत आहे. यामुळेच घोडेबाजार वाढला. पदोन्नती प्रक्रिये घोडेबाजार झाल्यामुळे अपंग आणि मतीमंद मुलांचे पालक असलेल्या कर्मचाऱ्यांपुुढे अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय विधवा महिला कर्मचाऱ्यांचीही अडचण होत आहे. त्यांच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. पदोन्नती प्रक्रियेतील घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी ही प्रक्रियासुध्दा समुपदेशनाने करण्याची आवश्यकता आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)