आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. या घटनेचा येथील मुस्लीम समाज बांधवांनी निषेध नोंदवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.उत्तरप्रदेशात अयोध्या येथे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीदीचा विध्वंस करण्यात आला. या घटनेत समाजकंटक, विविध संघटना आणि काही पक्षांचा सहभाग होता, असा आरोप मुस्लीम बांधवांनी केला. याबाबत सबळ पुरावे असल्याचा दावाही केला. तरीही मशीद पाडणाऱ्यांविरूद्ध अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. २५ वर्षानंतरही या प्रकरणात न्याय मिळाला नाही. यामुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत असून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लीम बांधवांनी निवेदनातून केली आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन सादर करताना तारिक लोखंडवाला, शब्बीर खान, शाज अहेमद, सलीमशाह सागवान, आसिम अली, अमन निर्बाण, जावेद अन्सारी, जुल्फेकार अहेमद, जुवेद जोहर, साजीद खान, जावेद अखतर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
बाबरी मशीद विध्वंसाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 22:50 IST
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. या घटनेचा येथील मुस्लीम समाज बांधवांनी निषेध नोंदवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
बाबरी मशीद विध्वंसाचा निषेध
ठळक मुद्देमुस्लीम बांधवांचे निवेदन : दोषींवर कारवाई करण्याची मागणी